‘रोहयो’तून १०७३ सिंचन विहिरींना मंजुरी

By Admin | Updated: March 18, 2017 23:42 IST2017-03-18T23:40:10+5:302017-03-18T23:42:45+5:30

उस्मानाबाद : राज्य शासनाने समृद्ध महाराष्ट्र कल्याण योजनेअंतर्गत अकरा कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे.

Approval of 1073 irrigation wells from Roho | ‘रोहयो’तून १०७३ सिंचन विहिरींना मंजुरी

‘रोहयो’तून १०७३ सिंचन विहिरींना मंजुरी

उस्मानाबाद : राज्य शासनाने समृद्ध महाराष्ट्र कल्याण योजनेअंतर्गत अकरा कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून अगामी दोन वर्षात जिल्ह्यात साडेचार हजार विहिरी खोदण्यात येणार आहेत. मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामसभांतून सुमारे १ हजार ७३ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. यापैकी ७७ विहिरींच्या कामांना सुरूवात करण्यात आली आहे. ही सर्व कामे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून केली जाणार आहेत.
समृद्ध महाराष्ट्र कल्याण योजनेअंतर्गत शासनाने अकरा कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. यामध्ये सिंचन विहीर, शेततळे, भू-संजीवनी व्हर्मी कंपोस्टींग, भू-संजीवनी नाडेप कंपोस्टींग, फळबाग लागवड, निर्मल शौचालय, निर्मल शोषखड्डे, गाव तलाव, रोपवाटिका, वृक्ष लागवड आणि समृद्ध ग्राम योजनेचा समावेश आहे. सदरील अकरा कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे. सातत्याने उद्भवणारी दुष्काळी परिस्थिती लक्षात घेवून आगामी दोन वर्षात सुमारे साडेचार विहिरी खोदण्यात येणार आहेत. काही दिवसापूर्वी घेण्यात आलेल्या ग्रामसभेतून सुमारे १ हजार ७३ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
यापैकी २१४ कामांना तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. तर १०६ विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, ७७ विहिरींना कार्यारंभ आदेश दिले असून प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात आली असता २९ विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत.
६ हजार ६०० शेततळी
अकरा कलमी कार्यक्रमाअंतर्गत शेततळ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्याला ६ हजार ६०० शेततळ्यांचे उद्दिष्ट आहे. ग्रामसभेतून २८७ लाभार्थ्यांची निवड करण्यात येवून १७७ शेततळ्यांना तांत्रिक मान्यता दिली आहे. तर ११० शेततळ्यांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ७१ शेततळ्यांना कार्यारंभ आदेश देवून प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली असता आजवर १९ शेततळी खोदून पूर्ण झाली आहेत. आगामी दोन वर्षामध्ये विहिरींसह शेततळ्याची सर्व कामे पूर्ण केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Web Title: Approval of 1073 irrigation wells from Roho

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.