नगुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक
By Admin | Updated: June 19, 2014 00:17 IST2014-06-18T23:44:42+5:302014-06-19T00:17:03+5:30
परभणी : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०१४ चा निकाल नुकताच घोषित झाला असून जिल्ह्यातील विविध विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

नगुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक
्परभणी : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०१४ चा निकाल नुकताच घोषित झाला असून जिल्ह्यातील विविध विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
संत तुकाराम विद्यालय, धानोरा बु.
जिंतूर तालुक्यातील धानोरा येथील संत तुकाराम विद्यालयाचा दहावीचा निकाल ८८.६२ टक्के एवढा लागला आहे. परीक्षेमध्ये १६७ विद्यार्थ्यांपैकी १४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातून आकाश बोराडे, देवानंद शिंदे, श्रीराम मोरे हे विद्यार्थी प्रथम आले आहेत. तर श्रीराम मोरे द्वितीय, पल्लवी गीते तृतीय आली आहे. संस्थाध्यक्ष भगवानराव वटाणे, दोडके यांनी कौतुक केले आहे.
शकुंतलाबाई बोर्डीकर विद्यालय, वर्णा
जिंतूर तालुक्यातील वर्णा येथील श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर विद्यालयाचा दहावीचा निकाल ९० टक्के लागला आहे. विद्यालयातून रामेश्वर अंभुरे, पूजा अंभुरे हे विद्यार्थी अनुक्रमे प्रथम व द्वितीय आले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा मीनाताई बोर्डीकर, आ. रामप्रसाद बोर्डीकर, मुख्याध्यापक मुंजाभाऊ अंभुरे, वाकळे, रोडे, ठोंबरे, मेहेत्रे, भोडवे, रासवे आदींनी कौतुक केले आहे.
हरिबाई वरपूडकर विद्यालय, पेडगाव
कै. हरिाबाई वरपूडकर विद्यालयाचा दहावीचा निकाल ७० टक्के लागला आहे. विद्यालयातून आकाश देशमुख, सचिन शेळके, गणेश ढेंबरे हे विद्यार्थी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आले आहेत.
भारत भारती विद्यालय, परभणी
भारत भारती विद्यालयाचा दहावीचा निकाल ९२.७२ टक्के लागला आहे. विद्यालयातून गणेश कानडे, संदीप करवर, अशोक यादव, मुंजा गोरे या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला आहे.
बोबडे पाटील विद्यालय, झरी
कै. बाबारावजी बोबडे पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८० टक्के लागला आहे. विद्यालयातून नारायण अबदागीरे हा प्रथम आला आहे. तर नंदा तिथे, माणिक राऊत, बावरी मुकेशसिंग रुपसिंग, योगेश पांचाळ, आकाश गिरी हे विद्यार्थी प्रथमश्रेणीमध्ये आले आहेत. या यशाबद्दल संस्थाध्यक्ष संतोष बोबडे, मुख्याध्यापक बालासाहेब कदम, प्राचार्य बाळासाहेब देवकर आदींनी कौतुक केले आहे.
राजे संभाजी विद्यालय, तरोडा
राजे संभाजी विद्यालयाचा दहावीचा निकाल ९४.०० टक्के लागला आहे. विद्यालयातून प्रमिला शेळके हिने ८९.६४ टक्के गुण घेऊन विद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळविला. तर पूजा शेळके, कविता शेळके या विद्यार्थिनीने द्वितीय व तृतीय आल्या आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचा खा. बंडू जाधव, संस्थाध्यक्ष उदय देशमुख, मुख्याध्यापक दिगंबर मोरे यांनी कौतुक केले आहे. (प्रतिनिधी)
रावसाहेब जामकर विद्यालय
कै. रावसाहेब जामकर विद्यालयाचा दहावीचा निकाल ९६.३३ टक्के लागाल आहे. विद्यालयातून प्रताप जाधव (९५.४०), नम्रता गोरे (९५.२०), अशिष नाईक (९३.२०) हे विद्यार्थी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आले आहेत. तसेच प्रथम श्रेणीमध्ये प्रणिता मंमोड (९३.००), दत्ता मिठे (९२.६०), रोहित नन्हेर (९२.४०), प्राजक्ता देशमुख (९१.८०), अशिष हुंबरे (९१.४०), सुचिता हेलसकर (९१.४०), अनुराधा सांगळे (९१.२०), निकीता पवार (९१.२०), योगेश भोग (९१.००), अजय सामाले (९०.८०), वैष्णवी चरके (९०.८०), प्रसाद कदम (९०.४०) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष हेमंत जामकर, अॅड. किरण सुभेदार, विजयसिंह जामकर, अॅड. बाळासाहेब जामकर, डॉ. संजय टाकळकर, डॉ. अभय सुभेदार, अॅड. मंगेश सुभेदार, संग्राम जामकर, प्राचार्य सुदाम लाड, उपमुख्याध्यापक डी.डी. हिप्पळगावकर आदींनी कौतुक केले आहे.