एकाच जागेवर दोन मुख्याध्यापकांची नियुक्ती

By Admin | Updated: July 8, 2014 00:55 IST2014-07-07T23:04:34+5:302014-07-08T00:55:49+5:30

माजलगाव: बीड जिल्हा परिषदेतील सावळ्या गोंधळाचे अनेक नमुने बाहेर पडायला सुरुवात झाली आहे. धारुर पाठोपाठ माजलगावातही समायोजनात अनियमितता झाल्याचे उघड झाले आहे.

Appointment of two headmasters in one place | एकाच जागेवर दोन मुख्याध्यापकांची नियुक्ती

एकाच जागेवर दोन मुख्याध्यापकांची नियुक्ती

माजलगाव: बीड जिल्हा परिषदेतील सावळ्या गोंधळाचे अनेक नमुने बाहेर पडायला सुरुवात झाली आहे. धारुर पाठोपाठ माजलगावातही समायोजनात अनियमितता झाल्याचे उघड झाले आहे. माजलगाव शहरातील केंद्रीय प्राथमिक शाळा नं. १ मध्ये एकाच जागेवर दोन मुख्याध्यापकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. धारुर तालुक्यातील कोळपिंप्रीपाठोपाठ येथेही हाच प्रकार घडल्याने जि.प.तील गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.
बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जवळेकर यांच्या दुर्लक्षामुळे येथील एका जि.प. शाळेतील एकाच पदावर दोन मुख्याध्यापकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. धारुर तालुक्यातील कोळपिंप्रीची पुनरावृत्ती माजलगावात झाली आहे. शहरातील केंद्रीय प्राथमिक शाळा क्र. १ याठिकाणी मुख्याध्यापकपदावर समायोजनातून उत्तम धनू आडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा बदली आॅर्डर क्र. ६१२२ असा आहे. असे असतानाही वडवणी तालुक्यातून पठाण जलालखाँ यांची ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून बदली करण्यात आली.
एकाच जागेवर दोन मुख्याध्यापकांची बदली झाल्याने येथील कारभार नेमका कोणी बघायचा असा प्रश्न नियुक्ती झालेल्या दोन्ही मुख्याध्यापकांना पडला होता. तालुक्यातील पात्रूड येथील माध्यमिक शाळेत समुपदेशनातून ३ जागा भरण्यात आलेल्या असताना शाळेत पुन्हा एका शिक्षकाची याच ठिकाणी बदली करण्यात आली. ३ जागेसाठी ४ शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या तर तालुक्यातीलच बडेवाडी येथील जि.प. शाळेतही ३ पदे दर्जा वाढमधून भरलेले असताना केज तालुक्यातील २ शिक्षकांच्या बदल्या याच शाळेत करण्यात आल्या आहेत. जागा भरलेल्या असतानाही अतिरिक्त शिक्षकांच्या बदल्या पुन्हा त्याच ठिकाणी केल्याने नियमानुसार बदली होऊन गेलेल्या शिक्षकांवर एक प्रकारे हा अन्याय झाल्याच्या प्रतिक्रिया शिक्षकांमधून ऐकावयास मिळाल्या.
याबाबत गटशिक्षणाधिकारी कावळे म्हणाले, वरिष्ठ पातळीवरुनच एका जागेवर दोघांची किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याने यात आमची काहीच चूक नाही.
गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा करुन अतिरिक्त मुख्याध्यापक, शिक्षकांची तालुक्यात इतर ठिकाणी बदली करुन अंशता: बदल करू, असे सांगितले.
(वार्ताहर)
नोकरी कोणी करावी असा प्रश्न
केंद्रीय प्राथमिक शाळा क्र. १ मध्ये एकाच जागेवर दोन मुख्याध्यापकांची नियुक्ती
धारुर तालुक्यात कोळपिंप्री येथेही घडला होता असाच प्रकार
जि.प.च्या कारभाराविषयी सर्वसामान्यांना पडला प्रश्न

Web Title: Appointment of two headmasters in one place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.