नगराध्यक्षासाठी पंचवीस उमेदवारांचे अर्ज ठरले वैैध !

By Admin | Updated: November 3, 2016 01:40 IST2016-11-03T01:39:19+5:302016-11-03T01:40:57+5:30

उस्मानाबाद : यावेळी नगराध्यक्ष पदासाठीची निवडणूक थेट जनतेतून होत आहे. त्यामुळे प्रमुख पक्षासह अपक्षांनीही निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली आहे.

Appointment of twenty-five candidates for the city's election! | नगराध्यक्षासाठी पंचवीस उमेदवारांचे अर्ज ठरले वैैध !

नगराध्यक्षासाठी पंचवीस उमेदवारांचे अर्ज ठरले वैैध !

उस्मानाबाद : यावेळी नगराध्यक्ष पदासाठीची निवडणूक थेट जनतेतून होत आहे. त्यामुळे प्रमुख पक्षासह अपक्षांनीही निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली आहे. नगराध्यक्षासाठी ३२ जणांनी ५८ अर्ज दाखल झाले होते. छाननीअंती ७ जणांचे अर्ज अपात्र ठरले. उर्वरित २५ पैकी प्रमुख पक्षाच्या आठ उमेदवारांसह १७ अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत. तर नगरसेवकासाठी २४१ जणांचे अर्ज वैध ठरले. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासठीची मुदत ११ नोव्हेंबरपर्यंत असल्याने यानंतरच निवडणूक आखाड्याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी दिवसागणिक जोर धरू लागली आहे. नगराध्यक्ष, नगरसेवक पदासाठी २४ ते २९ आॅक्टोबर या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. पक्षाकडून आपणालाच उमेदवारी मिळणार, अशी अपेक्षा ठेवून असलेल्या अनेक इच्छुकांची शेवटच्या टप्प्यात निराशा झाली. त्यामुळे संबंधितांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले. परंतु, यापैकी अनेक अपक्षांनी उमेदवारी अर्जावर पाच सूचकांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या नाहीत, काहींनी केवळ सूचकांची नावे दिली तर काहींनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केलेली नव्हती. त्यामुळे छाननीअंती असे उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यातून बाहेर पडले. नगराध्यक्ष पदासाठी एक -दोन नव्हे, तर तब्बल ३२ जणांनी ५८ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. बुधवारी झालेल्या छाननीअंती ३२ पैकी ७ जणांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. तर २५ जणांचे अर्ज वैध ठरले. यामध्ये प्रमुख पक्षाच्या आठ उमेदवारांसह १८ अपक्षांचाही समावेश आहे.
यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल पाटोदेकर, शिवसेनेचे मकरंद राजेनिंबाळकर, भाजपाचे नितीन काळे, काँग्रेसचे मधुकर तावडे, बसपा (बीएसपी) चे संजयकुमार वाघमारे, आरपीआय (ए) चे संजयकुमार यादव, रासपच्या लता मुकुंद धनवडे आणि भारिपचे विकास बनसोडे यांचा समावेश आहे. तर अपक्ष म्हणून मोमीन जाफर अली हैदर अली, अमित शिंदे, अ‍ॅड. खंडेराव चौरे, विजय बनसोडे, नितीन बागल, अतुल बागल, सुरज साळुंके, सतीश दंडनाईक, अमरसिंह देशमुख, बाळासाहेब काकडे, रविनंद नामदेव ओव्हाळ, सत्तार अफसाना सत्तार अब्दुल, राजेंद्र घोडके, शेख युसूफ शमशोद्दीन, प्रदीप नेताजी साळुंके, पठाण मैन्नुदीन महमद ख्वॉजा आणि मुंडे मोहन वसंतराव यांचा समावेश आहे. दरम्यान, नगरसेवक पदासाठीही मोठ्या प्रमाणात उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. छाननीअंती सुमारे ८१ जणांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले आहेत. तर २४१ जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्रभाग क्र.१८ (अ) मधील अनुराधा वाघमारे, प्रभाग क्र.२ (ब), दीपाली धनंजय पाटील, प्रभाग ७ (अ) मधील काँग्रेसचे प्रमोद शिवाजी झेंडे, प्र्रभाग ११ (ब) मधील शिवसेचे संदीप गोरोबा सलगर यांचे अर्ज अवैध ठरले आहेत. तर प्र्रभाग १५ (अ) मधील चंद्रकला राजेंद्र घोडके यांना शपथ पत्रावरील माहिती देण्यास मुदत देण्यात आली आहे. काही किरकोळ अपवाद वगळता बुधवारची छाननी प्रक्रिया शांततेत पार पडल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Appointment of twenty-five candidates for the city's election!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.