४६ गावांसाठी १९ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती
By Admin | Updated: April 4, 2015 00:34 IST2015-04-04T00:27:04+5:302015-04-04T00:34:23+5:30
औसा : तालुक्यातील ४१ गावे व ५ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे़ ४६ गावांसाठी १९ निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत़

४६ गावांसाठी १९ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती
औसा : तालुक्यातील ४१ गावे व ५ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे़ ४६ गावांसाठी १९ निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत़ बुधवारपर्यंत ६६४ उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे़
४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १४ तसेच ५ गावांतील पोटनिवडणुकीसाठी दोन आणि तीन राखीव निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे़ निवडणूक निर्णय अधिकारीनिहाय यादी - सी़ एस़ लकडे - चलबुर्गा, मसलगा, भुसणी, व्ही़डी़लटुरे- उजनी, पारधेवाडी, माळुंब्रा, पी़एस़ मुगावे - भादा, उंबडगा खु़, सिंदाळा ज़, एस़बी़मुगळे - नागरसोगा, चिंचोलीतपसे, सिंदाळा लो़, आऱएऩपत्रिके- मासुर्डी, टाका, उंबडगा बु़, ए़व्ही़ मादळे - हासेगाव, सेलू, भेटा, एच़जीक़ांबळे- नांदुर्गा, मंगरूळ, वाघोली, एस़जीक़ाळे- लोदगा, कारला, हासेगाववाडी, एऩबीक़ुमठेकर- लखनगाव, लामजना, जी़आरख़ुर्दे- शिवणी बु़, धनोरा, जयनगर, एम़डी़ मुक्तापूरे- सत्तरधरवाडी, सिंदाळवाडी, टेंबी, एस़एम़ मिरजगावकर- खरोसा, आपचुंदा, बऱ्हाणपूर, एसक़ेक़ेंद्रे- तुंगी बु़, समदर्गा, कोरंगळा, एस़ए़पवार- मोगरगा, बेलकुंड, हारेगाव, पोटनिवडणुकीसाठी एस़व्ही़ कुंभकर्ण- बोरगाव, सारणी, काळमाथा, चिल्ले-किल्लारी, मातोळा तर एस़बी़देडे, व्ही़एम़ बिडवे, बी़ए़ संकाये यांची राखीव म्हणून नेमणूक करण्यात आली आहे़ (वार्ताहर)