मतदान जनजागृतीसाठी ब्रॅन्ड अम्बेसडर नियुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:51 IST2017-09-15T00:51:44+5:302017-09-15T00:51:44+5:30
महापालिका निवडणुकीत मतदानांचे प्रमाण वाढावे यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान जनजागृती केली जाणार आहे. या जनजागृतीसाठी महापालिकेने ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री मयुरी भाकरे- देशमुख हिचे ब्रॅन्ड अम्बेसडर म्हणून निवड केली आहे.

मतदान जनजागृतीसाठी ब्रॅन्ड अम्बेसडर नियुक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : नांदेड : महापालिका निवडणुकीत मतदानांचे प्रमाण वाढावे यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान जनजागृती केली जाणार आहे. या जनजागृतीसाठी महापालिकेने ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री मयुरी भाकरे- देशमुख हिचे ब्रॅन्ड अम्बेसडर म्हणून निवड केली आहे.
महापालिकेच्या जनजागृती कार्यक्रमात मयुरी भाकरे-देशमुख सहभागी होणार आहे. मनपाच्या जनजागृती बॅनरवर त्यांचे छायाचित्र राहतील. तसेच शहरात होणाºया रोड शो मध्ये त्या सहभागी होणार आहेत. महापालिकेच्या वतीने शहरातील विविध महाविद्यालयात होणाºया जनजागृती कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती राहील.
दरम्यान, महापालिका निवडणूक अनुषंगाने महापालिकेत गुरुवारी राजकीय पक्षांचीही बैठक झाली. या बैठकीत आॅनलाईन उमेदवारी, दैनंदिन खर्च सादर करणे, बँक व्यवहार, आचारसंहिता पालन, प्रचारादरम्यान देण्यात येणाºया विविध परवानगीबाबत इच्छुकांना माहिती देण्यात आली. यावेळी विविध पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.