कन्नडमधील ८३ ग्रा.पं.च्या निवडणुकीसाठी आजपासून अर्ज स्वीकारले जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:03 IST2020-12-24T04:03:26+5:302020-12-24T04:03:26+5:30
उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र ऑनलाइन भरून ते संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे २३ डिसेंबरपासून ३० डिसेंबरपर्यंत दाखल करावे लागणार आहे. निवडणूक निर्णय ...

कन्नडमधील ८३ ग्रा.पं.च्या निवडणुकीसाठी आजपासून अर्ज स्वीकारले जाणार
उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र ऑनलाइन भरून ते संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे २३ डिसेंबरपासून ३० डिसेंबरपर्यंत दाखल करावे लागणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मागणी केलेली आवश्यक ती सर्व कागदपत्रे सादर करणे उमेदवारांना बंधनकारक आहे. नामनिर्देशन भरण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने एकाच ठिकाणी एकत्र येणार आहेत. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, वाहन व्यवस्थेमुळे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता नमूद कालावधीत साठे चौक ते तहसील ते बाजारपेठ या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. नमूद कालावधीत निवडणूक संदर्भाने तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनी त्यांची दुचाकी वाहने जुने बस स्टँड येथे आणि चारचाकी वाहने उरूस मैदान किंवा तालुका क्रीडा संकुल, चाळीसगाव रोड, कन्नड येथे पार्क करावीत, असे आदेश तालुका कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी काढले आहेत. तरी नागरिकांनी नमूद कालावधीमध्ये शनी मंदिर ते सिद्दीक चौक आणि बस स्टँड ते भिलपलटन या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर रेंगे यांनी केले आहे.