शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १६ हजार ९४२ उमेदवारांचे अर्ज वैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 14:21 IST

Gram Panchayat elections ६१७ ग्रामपंचायतींमध्ये २ हजार ९० प्रभागांसाठी ५६८३ सदस्यसंख्या राहणार आहे.

ठळक मुद्दे४ जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे.१५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. १८ जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी

औरंगाबाद : जिल्ह्यात ६१७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १७ हजार ३२८ अर्जांच्या छाननीअंती ३७१ अर्ज अवैध तर १६ हजार ९४२ उमेदवारांचे १६ हजार ९५७ अर्ज वैध ठरविण्यात आले. बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ९ हजार ९६६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. गुरुवारी उशिरापर्यंत अर्जांची छाननी सुरू होती.

या छाननीत गंगापूर तालुक्यातील ८५ अर्ज अवैध ठरले. वैजापूर ३७, सिल्लोड ६५, कन्नड ४८, पैठण २२, औरंगाबाद ५१, फुलंब्री २०, सोयगाव ३३ व खुलताबाद तालुक्यात २० उमदेवारी अर्ज छाननीअंती बाद ठरविण्यात आले. वैजापूर तालुक्यातील २६४९ उमेदवारांचे अर्ज वैध तर सिल्लोड २३१९, कन्नड २०४३, पैठण २४५४, औरंगाबाद २१८१, गंगापूर २२२६, फुलंब्री १४४८, सोयगाव ९५३ आणि खुलताबाद तालुक्यातील ६६९ उमदेवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. 

४ जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. ६१७ ग्रामपंचायतींमध्ये २ हजार ९० प्रभागांसाठी ५६८३ सदस्यसंख्या राहणार आहे. या निवडणुकीमध्ये १२ लाख ४६ हजार ५३६ मतदार मतदानासाठी पात्र आहेत. १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. १८ जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी होणार आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतAurangabadऔरंगाबादElectionनिवडणूक