भोगवटा प्रमाणपत्र प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला

By Admin | Updated: June 22, 2016 00:57 IST2016-06-22T00:48:36+5:302016-06-22T00:57:40+5:30

औरंगाबाद : सेव्हन हिल येथील मिळकतीबाबत जारी करण्यात आलेल्या भोगवटा प्रमाणपत्र प्रकरणी सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी तिघा आरोपींचा नियमित जामीन अर्ज फेटाळून लावला.

The application for bail application in the occupancy certificate rejected | भोगवटा प्रमाणपत्र प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला

भोगवटा प्रमाणपत्र प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला


औरंगाबाद : सेव्हन हिल येथील मिळकतीबाबत जारी करण्यात आलेल्या भोगवटा प्रमाणपत्र प्रकरणी सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी तिघा आरोपींचा नियमित जामीन अर्ज फेटाळून लावला.
याप्रकरणी मनपा उपअभियंता भगवंत फड यांनी शेख रियाझ (कॉम्प्युटर आॅपरेटर, मनपा), जयराम बुळे (शिपाई) व दशरथ आदमाने यांच्याविरुद्ध सिटीचौक पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. त्यानुसार प्रवीण चौधरी यांनी भूखंड क्र. २ भूमापन क्र. १२३७४/१३, सेव्हन हिल कॉलनीच्या भोगवटा प्रमाणपत्राची मागणी केली होती. त्यांच्या प्रस्तावानुसार सहायक संचालक नगररचना बोंबले हे संबंधित भोगवटा प्रमाणपत्रासाठी मोजमाप घेण्यासाठी १८ मे २०१६ रोजी त्या ठिकाणी गेले असता प्रवीण चौधरी यांनी त्यांना मोजमाप घेण्यास मज्जाव केला.
संबंधित मिळकतीबाबत भोगवटा प्रमाणपत्र आपल्याला मिळाले असल्याचे सांगितले. यावरून बोंबले यांनी चौधरी यांच्याकडे भोगवटा प्रमाणपत्र आदेश व नकाशाची मागणी केली असता त्यांनी छायांकित प्रती त्यांना दिल्या. त्यानंतर बोंबले यांनी सदरील कागदपत्राबाबत मनपा कार्यालयात चौकशी केली असता ही कागदपत्रे बनावट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत हर्सूल येथे आहेत. सहायक सरकारी वकील एस. टी. शिरसाट यांनी आरोपींच्या जामिनाला विरोध केला.

Web Title: The application for bail application in the occupancy certificate rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.