जीएसटीसाठी नोंदणीचे व्यापाऱ्यांना आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2017 00:27 IST2017-07-13T00:23:05+5:302017-07-13T00:27:14+5:30
नांदेड: वस्तू व सेवाकर कायद्याबाबत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य वस्तू व सेवाकर कार्यालयात मदत केंद्राची स्थापना करण्यात आली असून जीएसटीत पात्र व्यापाऱ्यांनी त्वरित नोंदणी करावी,

जीएसटीसाठी नोंदणीचे व्यापाऱ्यांना आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: वस्तू व सेवाकर कायद्याबाबत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य वस्तू व सेवाकर कार्यालयात मदत केंद्राची स्थापना करण्यात आली असून जीएसटीत पात्र व्यापाऱ्यांनी त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन सहआयुक्त मा़म़ कोकणे यांनी केले़
वस्तू व सेवाकर मदत केंद्रात अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे़ या केंद्रात व्यापाऱ्यांना या कायद्याबाबत येणाऱ्या अडचणींचे निराकरण करता येणार आहे़ तसेच व्यापाऱ्यांना या कायद्यात नोंदणी क्रमांक व नोंदणी अर्ज नि:शुल्क भरुन देण्यात येत आहे़ १ जुलैपासून या कायद्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली असून त्यानुसार राज्यातील कर गोळा करण्याची जबाबदारी राज्य वस्तू व सेवाकर कार्यालयावर सोपविण्यात आली आहे़ त्यासाठी विविध कार्यक्रमांद्वारे जिल्ह्यात जनजागृती व शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे़ नोंदणीसाठी दोन राज्य कर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून या अधिकाऱ्यांना नांदेड विभागातील नवीन नोंदणी अर्ज मंजूर करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत़ नोंदणी प्रक्रिया पूर्ण करुन जीएसटी क्रमांक देण्यात येत आहे़ वस्तू व सेवाकर कायद्यानुसार राज्यात नोंदणी घेण्याची वार्षिक उलाढाल २० लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे़