अप्पर आयुक्तांनी फेटाळले अपिल
By Admin | Updated: August 6, 2015 00:08 IST2015-08-05T23:32:02+5:302015-08-06T00:08:50+5:30
बीड : नियमबाह्य पदोन्नत्या रद्दच्या कारवाईला आव्हान देणाऱ्या शिक्षकांचे अपिल बुधवारी अप्पर आयुक्तांनी फेटाळून लावले. त्यामुळे संबंधित शिक्षकांना जोरदार चपराक बसली.

अप्पर आयुक्तांनी फेटाळले अपिल
बीड : नियमबाह्य पदोन्नत्या रद्दच्या कारवाईला आव्हान देणाऱ्या शिक्षकांचे अपिल बुधवारी अप्पर आयुक्तांनी फेटाळून लावले. त्यामुळे संबंधित शिक्षकांना जोरदार चपराक बसली.
जिल्हा परिषदेत २०१४ मध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर पदोन्नत्या झाल्या होत्या. तत्कालीन सीईओ राजीव जवळेकर यांनी पदोन्नती समितीची बैठक न घेता अनेक शिक्षकांना केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी ही पदे बहाल केली. दरम्यान, सीईओ नामदेव ननावरे यांनी १२ जून २०१५ रोजी बेकायदेशीर पदोन्नत्या रद्दचे आदेश काढले. त्याविरुद्ध १२ शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अप्पर आयुक्तांकडे दाद मागण्यास सांगितले. त्यानंतर शिक्षकांनी अप्पर आयुक्त किसन लवांदे यांच्याकडे अपिल केले. मात्र, लवांदे यांनी हे अपिल फेटाळून लावले. (प्रतिनिधी)