तलाठ्यांकडे बँक खाते क्रमांक देण्याचे आवाहन
By Admin | Updated: January 11, 2016 00:07 IST2016-01-11T00:00:45+5:302016-01-11T00:07:34+5:30
औरंगाबाद : खरीप अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने अदा करण्यासाठी तलाठ्यांकडे बँक खाते क्रमांक द्यावा, असे आवाहन तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी केले आहे.

तलाठ्यांकडे बँक खाते क्रमांक देण्याचे आवाहन
औरंगाबाद : खरीप अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने अदा करण्यासाठी तलाठ्यांकडे बँक खाते क्रमांक द्यावा, असे आवाहन तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी केले आहे. जिल्ह्यात ७ लाखांच्या आसपास शेतकरी आहेत. औरंगाबाद तालुक्यात १९० गावे असून त्यामध्ये ८० हजारांच्या आसपास शेतकरी आहेत.
शेतकऱ्यांचे बँक खाते वेगवेगळ्या बँकांमध्ये आहेत. काही शेतकऱ्यांचे बँक खाते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आहे, तर काहींचे राष्ट्रीयीकृत आणि खाजगी बँकांमध्ये आहे. गेल्या वर्षी बाराखडीनुसार असलेली अद्याक्षरे खाजगी बँकांच्या डाटा एण्ट्रीमध्ये न आल्याने सुमारे ४० हजार शेतकरी अनुदानापासून वंचित राहिल्याचे सहकार राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मध्यंतरी समोर आले होते. त्यामुळे यावेळेस बँक खाते कोणत्या बँकेत आहे, याची माहिती तलाठ्यांच्या हद्दीतील शेतकऱ्यांकडूनच जमा करून घेण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करीत आहे. जिल्ह्यातील १३५३ गावांसाठी १९१ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित होता. १०७ कोटी रुपयांचा निधी २ जानेवारी रोजी आला आहे. सुमारे ८४ कोटी रुपयांचा निधी मिळालेला नाही.