अंधश्रद्धेच्या आहारी न जाता कोरोना लस घेण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:05 IST2021-06-18T04:05:21+5:302021-06-18T04:05:21+5:30
पुढे बोलताना पंकज वंजारे म्हणाले की, कोरोना रोगावर प्रतिबंध घालणाऱ्या लसीसंदर्भात समाजात अनेक गैरसमज पसरलेले आहे. यामुळे लसीकरण मोहिमेत ...

अंधश्रद्धेच्या आहारी न जाता कोरोना लस घेण्याचे आवाहन
पुढे बोलताना पंकज वंजारे म्हणाले की, कोरोना रोगावर प्रतिबंध घालणाऱ्या लसीसंदर्भात समाजात अनेक गैरसमज पसरलेले आहे. यामुळे लसीकरण मोहिमेत अडकाठी येताना दिसून येते. हा गैरसमज अंधश्रद्धातून निर्माण होत असल्याचे दिसून येते. कोरोना संपवण्यासाठी काहींनी आपले अवयव देवीला अर्पण केलेत. तर कुठे हजारो कोंबड्या-बकऱ्यांचे बळी देण्यात आले. दैवी शक्तीने मांत्रिक, बाबा, देवी हे आपला आजार दुरुस्त करेल या अंधश्रद्धेने अनेकांचे बळी घेतले आहेत. लस घेतल्याने कुठलेही चुंबकत्व शरीरात निर्माण होत नाही, या दाव्याची ही त्यांनी पोलखोल केली. या ऑनलाईन व्याख्यानात जिल्हा संघटक पंकज देशमुख, जिल्हा अध्यक्ष रवींद्र वाकोडे, सचिव राजकुमार कांबळे, राजकुमार कांबळे, रावसाहेब जारे, गंगासागर सुदावले, आकाश इंगळे, संदीप त्रिभुवन, योगेश पालोदे यांनी सहभाग घेतला.