औरंगाबाद : अनुसूचित प्रवर्गासाठी राखीव असलेल्या मतदारसंघातून आंबेडकरी विचारधारेच्या उमेदवारांना विजयी करून हे मतदारसंघ मागास जातीसाठी राखीव ठेवण्याचा उद्देश साध्य करा, असे आवाहन ऐक्यवादी रिपब्लिकन, भीमशक्ती व रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत केले. या धोरणानुसार औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते गंगाधर गाडे यांच्या प्रचारार्थ आम्ही मैदानात उतरलो असल्याचे त्यांनी स्पष्टकेले. ऐक्यवादी रिपब्लिकनचे प्रदेशाध्यक्ष रमेश गायकवाड, नगरसेवक कैलास गायकवाड, रिपब्लिकन सेनेचे दिनकर ओंकार, भीमशक्तीचे प्रदेश सचिव अनिलकुमार सोनकांबळे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली. रमेश गायकवाड म्हणाले की, राखीव मतदारसंघातून विधिमंडळात जाणाऱ्या लोकप्रतिनिधींनी त्या मागास जात समूहाचे प्रतिनिधित्व करणे अपेक्षित असते; परंतु गेल्या काही वर्षांपासून या मतदारसंघातून जातीयवादी पक्षाचे उमेदवार विजयी होत आहेत. विधिमंडळात ते मागासवर्गीय समूहाच्या व्यथा मांडत नाहीत. गंगाधर गाडे यांच्यासारखे गंभीर नेतृत्व विधिमंडळात गेले, तर त्याचा राज्यातील सर्वच मागासवर्गीयांना लाभ होईल. दिनकर ओंकार म्हणाले की, सर्वच आंबेडकरी चळवळीतील नेते व कार्यकर्त्यांनी ही भूमिका मान्य केली आहे; परंतु अनेकांना उघडपणे गाडे यांचा प्रचार करणे शक्य नसले तरी त्यांनी पाठिंबा मात्र दिला आहे.
पक्षभेद विसरण्याचे आवाहन
By admin | Updated: October 7, 2014 00:43 IST
औरंगाबाद : अनुसूचित प्रवर्गासाठी राखीव असलेल्या मतदारसंघातून आंबेडकरी विचारधारेच्या उमेदवारांना विजयी करून हे मतदारसंघ मागास जातीसाठी राखीव ठेवण्याचा उद्देश साध्य करा,
पक्षभेद विसरण्याचे आवाहन
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}