सुरेश धस यांच्या विरोधातील याचिका फेटाळली

By Admin | Updated: October 2, 2014 00:37 IST2014-10-01T23:59:02+5:302014-10-02T00:37:17+5:30

बीड : दोन पत्नी असलेल्या व्यक्तींना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविणारा कायदा अद्याप संसदेने केला नाही.

Appeal against Suresh Dhas rejected | सुरेश धस यांच्या विरोधातील याचिका फेटाळली

सुरेश धस यांच्या विरोधातील याचिका फेटाळली

हडपसर : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून आज शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजेर्पयत  11 जणांनी माघार घेतली असून, 6 प्रमुख पक्षांसह 14 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. माळी-मराठा, गाववाले-बाहेरगावचे अशा संमिश्र मतदारसंघाची निवडणूक बहुरंगी होणार असल्याचे निश्चित झाले आहे. काँग्रेसच्या बंडखोरांनी उमेदवारी माघारी घेऊन काँग्रेस सदस्यपदाचा सामूहिक राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसला मोठे ¨खंडार पडले आहे.
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दिलीप तुपे, फारुख इनामदार आणि बंडू गायकवाड, राष्ट्रवादीचे नगरसेवक आनंद आलकुंटे, विजय मोरे या प्रमुख उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. शिवसेनेच्या उमेदवाराबाबत महायुती तुटल्यामुळे भाजप आणि शिवसेनेची मते विभागली गेली आहेत. 
राष्ट्रवादी आणि कॉँग्रेस यांचीही तीच परिस्थिती झाली आहे.  तसेच त्याअगोदर प्रमोद भानगिरे यांनी शिवसेनेचा मोठा गट घेऊन मनसेमध्ये प्रवेश केला आहे. भाजप आणि रिपाइंची एकगठ्ठा मतेही त्यांची कमी झाली आहेत. 
 राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असून, हडपसरमध्ये त्यांचे नगरसेवक जास्त आहेत. पक्षाचे कार्यकर्तेही मोठय़ा संख्येने असून, त्यांना अंतर्गत बंडखोरांना शमविण्यात यश आले आहे, हा महत्त्वाचा भाग आहे. 
 उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर दिलीप तुपे, अनिल तुपे, माजी उपमहापौर प्रकाश मंत्री, माजी नगरसेवक दत्ताेबा ससाणो, माजी नगरसेवक सोपान गोंधळे, मोहन कांबळे, व्यापारी असोसिएशनचे पवन आगरवाल, अल्पसंख्याकाचे शराफत पानसरे, सुनील डांगमाळी, संघटक सचिव संजय डोंगरे, नामदेव कोतवाल, माजी सरपंच बाळासाहेब मोरे, सिरम कामगार युनियनचे सचिन तुपे, समीर तुपे या सर्वानी काँग्रेस सदस्यपदाचे सामूहिक राजीनामे दिले.(प्रतिनिधी)
 
पक्षाने आमच्यावर अन्याय केला 
दिलीपआबा तुपे यांनी सांगितले की, आम्ही काँग्रेसचे निष्ठावंत कार्येकर्ते असून, पक्षाने आमच्यावर अन्याय केला. त्यामुळे संतप्त होऊन आम्ही प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, काँग्रेसची केंद्रीय समिती आणि पुणो शहराध्यक्ष अभय छाजेड यांच्याकडे फॅक्सद्वारे अर्ज पाठविले आहेत. तसेच, भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला जाहीर पा¨ठंबा दिला आहे. भाजपमध्ये प्रवेश करायचा की नाही याबाबत कार्यकत्र्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. दरम्यान, मनसेचे राहुल तुपे व मिलिंद तुपे हेही आमच्याबरोबर असतील, असेही त्यांनी सांगितले आहे.  
 

 

Web Title: Appeal against Suresh Dhas rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.