अंताक्षरीचा लुटला मनमुराद आनंद

By Admin | Updated: July 20, 2014 01:07 IST2014-07-20T00:44:26+5:302014-07-20T01:07:31+5:30

औरंगाबाद : जुन्या- नव्या गाण्यांच्या विविध फेऱ्यांमध्ये आणि विविध तालांमध्ये ‘लोकमत सखी मंच’ तर्फे आयोजित अंताक्षरी स्पर्धा खूपच रंगली.

Antakshari's Lootla Manmurad Anand | अंताक्षरीचा लुटला मनमुराद आनंद

अंताक्षरीचा लुटला मनमुराद आनंद

औरंगाबाद : जुन्या- नव्या गाण्यांच्या विविध फेऱ्यांमध्ये आणि विविध तालांमध्ये ‘लोकमत सखी मंच’ तर्फे आयोजित अंताक्षरी स्पर्धा खूपच रंगली. स्पर्धेचा सखींनी मनमुराद आनंद घेतला. केवळ गाणीच नाही तर गाण्यांवरील नृत्यही सादर केले. यावेळी अंताक्षरी या कार्यक्रमाच्या असोसिएट स्पॉन्सरर डायबेटिक डाएट अँड न्युट्री हेल्थ क्लिनिकच्या डॉ. सुनीता शेळके यांनी ‘प्रमाणित आहार व विहार’ या विषयावर मार्गदर्शन केले.
लोकमत सखी मंचतर्फे घेण्यात आलेल्या अंताक्षरी स्पर्धेतील सहभागी महिलांसोबत प्रेक्षक महिलांचाही शेवटपर्यंत उत्साह कायम होता. ‘इंद्रायणीकाठी देवाची आळंदी’ या भक्तिगीताने स्पर्धेच्या पहिल्या अक्षर फेरीला सुरुवात झाली. या स्पर्धेत एकूण चार फेऱ्या घेण्यात आल्या. त्यात अक्षर फेरी, शब्द फेरी, धून फेरी आणि व्हिडिओ फेरीने स्पर्धेची सांगता झाली. प्रत्येक फेरीत स्पर्धकांनी ‘एक से बढकर एक’ अशी गाणी सादर केली. त्यातीलच मैया यशोदा, मुंगळा यासारख्या गाण्यांवर महिलांनी ठेका धरला. त्याचबरोबर ठंडे ठंडे पानी से न्हाना चाहिए, हम आपके है कौन, लाल दुपट्टा, रेशम का रुमाल, हम तूम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाय, यासारखी गाणी सादर झाली. सर्वच फेऱ्यांमध्ये चुरशीचा सामना झाला.
स्पर्धेच्या शेवटी श्रेयसच्या ‘पोस्टर बॉईज’ या चित्रपटाची टीम व्यासपीठावर विराजमान होताच महिलांनी टाळ्यांची बरसात केली. त्यानंतर श्रेयस तळपदे, दिलीप प्रभावळकर, समीर पाटीलयांनी सखींशी मनमोकळा संवाद साधला. या स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रेषित रुद्रवार आणि शीतल रुद्रवार यांनी केले. यावेळी सखी मंचच्या अध्यक्षा रेखा राठी, सचिव अनिता कोटगिरे, कमिटी मेंबर गीता अग्रवाल, पद्मजा मांजरमकर आदींची उपस्थिती होती. या स्पर्धेचे सरोज बगडिया व अर्चना नरसापूर यांनी परीक्षण केले. यावेळी विजेत्यांना पोस्टर बॉईजच्या टीमच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

हे आहेत विजेते
प्रथम - सिंधू खोतकर, शोभा सुरडकर
द्वितीय - सपना कासलीवाल, नेहा कासलीवाल
तृतीय - रजनी बोर्डे, आरती पाध्ये

Web Title: Antakshari's Lootla Manmurad Anand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.