मर्जीतील परीक्षार्थ्यांना अ‍ॅन्सर की

By Admin | Updated: June 9, 2015 00:17 IST2015-06-09T00:17:24+5:302015-06-09T00:17:24+5:30

बीड : लघुलेखन परीक्षेमध्ये वेळ संपल्यानंतर काही परीक्षार्थ्यांना अ‍ॅन्सर की देऊन त्यांच्याकडून पेपर सोडवून घेतल्याचा खळबळजनक प्रकार सोमवारी पुढे आला

Answering the candidates for the exams | मर्जीतील परीक्षार्थ्यांना अ‍ॅन्सर की

मर्जीतील परीक्षार्थ्यांना अ‍ॅन्सर की


बीड : लघुलेखन परीक्षेमध्ये वेळ संपल्यानंतर काही परीक्षार्थ्यांना अ‍ॅन्सर की देऊन त्यांच्याकडून पेपर सोडवून घेतल्याचा खळबळजनक प्रकार सोमवारी पुढे आला. हा सर्व प्रकार काही परीक्षार्थींनी मोबाईलद्वारे चित्रित केला असून, विद्यार्थी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
६ जून रोजी सकाळी ९ ते १०.३० यावेळेत इंग्रजी लघुलेखनाचा पेपर होता. ८० गुणांचे भाषांतर होते. डिक्टेटरने मजकूर डिक्टेट केल्यानंतर तो लेटरपॅडवर सांकेतिक लिपीत लिहून घ्यायचा होता. नंतर भाषांतर करावयाचे होते. मात्र, काही परीक्षार्थींनी भाषांतराची जागा कोरी सोडली. पेपर संपल्यानंतर त्यांना अ‍ॅन्सर की देऊन भाषांतर लिहून घेण्यात आले, अशी तक्रार क्रांतीसिंह विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे यांनी केली आहे.
प्रमोद बरडे, ओंकार जरांगे, अविनाश देशमुख, ऋषीकेश गिराम, प्रणव काकडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशाराही या सर्वांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. सीईओंना देखील निवेदन दिले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Answering the candidates for the exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.