उत्तर पोलीस ठाण्यात ४१ कर्मचारी नियुक्त

By Admin | Updated: April 24, 2015 00:37 IST2015-04-24T00:32:13+5:302015-04-24T00:37:03+5:30

उस्मानाबाद : जिल्हा पोलीस दलातील वार्षिक बदली प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून, एकूण ३२७ कर्मचाऱ्यांची ठाण्यांतर्गत बदली झाली आहे़

Answered 41 people in the police station | उत्तर पोलीस ठाण्यात ४१ कर्मचारी नियुक्त

उत्तर पोलीस ठाण्यात ४१ कर्मचारी नियुक्त


उस्मानाबाद : जिल्हा पोलीस दलातील वार्षिक बदली प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून, एकूण ३२७ कर्मचाऱ्यांची ठाण्यांतर्गत बदली झाली आहे़ यात २३० कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या असून, ९७ जणांच्या विनंतीनुसार बदल्या करण्यात आलेल्या आहेत़ तर शहरात नव्याने होणाऱ्या उस्मानाबाद उत्तर पोलीस ठाण्यात ४१ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़
गतवर्षी बदली प्रक्रिया उशिरा झाल्याने कर्मचाऱ्यांची मोठी हेळसांड झाली होती़ गतवर्षीचा अनुभव पाहता यावर्षी पोलीस प्रमुख अभिषेक त्रिमुखे, अप्पर पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे यांनी एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण केली आहे़ २३० कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदली झाली असून, ९७ कर्मचाऱ्यांची विनंती बदली करण्यात आली आहे़ या बदली प्रक्रियेत पोलीस मुख्यालयात असलेल्या ८२ कर्मचाऱ्यांची इतर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली असून, ५४ जणांची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे़ यात सेवानिवृत्तीला आलेल्यांची संख्या अधिक आहे़ तर शहर पोलीस ठाण्यातील ३० जणांची बदली झाली असून, नव्याने १८, उत्तर पोलीस ठाण्यात ४१, बेंबळी पोलीस ठाण्यातील ९ जणांची बदली झाली असून, नव्याने ११ कर्मचारी आले आहेत़ लोहारा ठाण्यातील १९ जणांची बदली झाली असून, येथे चार कर्मचारी कमी होवून १५ नव्याने दाखल झाले आहेत़ तुळजापूर पोलीस ठाण्यातील २२ कर्मचाऱ्यांची बदली झाली असून, १९ नव्याने दाखल झाले आहेत़ येरमाळा ठाण्यातील ११ जणांची बदली झाली असून, नव्याने नऊ कर्मचारी आले आहेत़ तामलवाडी पोलीस ठाण्यातील ९ जणांची बदली झाली असून, ९ नवीन कर्मचारी आले आहेत़ नळदुर्ग पोलीस ठाण्यातील १५ कर्मचाऱ्यांची बदली झाली असून, १५ नव्याने दाखल झाले आहेत़ वाशी पोलीस ठाण्यातील ९ जणांची बदली झाली असून, इथे दोन कर्मचारी वाढून म्हणजे ११ नवे कर्मचारी बदली प्रक्रियेतून आले आहेत़ शिराढोण पोलीस ठाण्यातील ९ जणांची बदली झाली असून, येथे ०६ कर्मचारी नव्याने आले आहेत़ मुरूम ठाण्यातील १३ कर्मचाऱ्यांची बदली झाली असून, ११ नव्याने दाखल झाले आहेत़ परंडा पोलीस ठाण्यातील १७ जणांची बदली तर १२ नवीन कर्मचारी दाखल झाले आहेत़ भूम पोलीस ठाण्यातील १२ जणांची बदली झाली असून, १० कर्मचारी नव्याने दाखल झाले आहेत़ उमरगा पोलीस ठाण्यातील १५ जणांची बदली झाली असून, १० कर्मचारी नव्याने आले आहेत़ ढोकी ठाण्यातील १० जणांची बदली तर ९ कर्मचारी नव्याने आले आहेत़ कळंब पोलीस ठाण्यातील १७ जणांची बदली तर १६ कर्मचाऱ्यांची नव्याने नियुक्ती झाली आहे़ आंबी पोलीस ठाण्यातील दोघांची बदली झाली असून, चौघे नव्याने बदली होवून आले आहेत़ उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यातील चौघांची बदली झाली असून, नव्याने दोघे आले आहेत़ तर संगणक कक्षात ०२, जिविशात ८, स्थागुशात ४, मंदीर सुरक्षेसाठी १३, बीडीडीएस पथकामध्ये दोन, सुरक्षा शाखेत एक, मोटार परिवहन विभागात चार, आयुधिक शाखेत एका कर्मचाऱ्याची बदली करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Answered 41 people in the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.