‘त्या’ विद्यार्थिनींचा न्यायाधीशांसमोर जबाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2017 22:59 IST2017-05-30T22:55:13+5:302017-05-30T22:59:00+5:30
बीड : प्राचार्याकडून छेडछाड झालेल्या पीडित विद्यार्थिनींचा मंगळवारी सायंकाळी न्या.फातिमा बेग यांच्यासमोर इनकॅमेरा जबाब झाला.

‘त्या’ विद्यार्थिनींचा न्यायाधीशांसमोर जबाब
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : प्राचार्याकडून छेडछाड झालेल्या पीडित विद्यार्थिनींचा मंगळवारी सायंकाळी न्या.फातिमा बेग यांच्यासमोर इनकॅमेरा जबाब झाला. तसेच सकाळी महाविद्यालयात पोलीस बंदोबस्तात त्यांनी प्रात्यक्षिक परीक्षा दिली. संबंधित विद्यार्थिनींना मोठा मानसिक धक्का बसलेला असून ते आजही भयभयीत आहेत.
बीडमधील विठाई नर्सिंग महाविद्यालयाचा प्राचार्य राणा डोईफोडे याने विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करून त्यांची छेड काढल्याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. परंतु पोलिसांनी आपली दिशाभूल करून डोईफोडेविरोधात गंभीर गुन्हे लावले नव्हते. त्यामुळे या विद्यार्थिनींनी १६४ कलमांतर्गत न्यायाधिशांनी जबाब घेण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे मंगळवारी सायंकाळी पाच वाजता त्यांचे जबाब घेण्यात आले. यावेळी त्यांना आधार देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थि संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुली, त्यांच्या पालकांना धमक्या देणाऱ्यांना अटक करावी, मुलींची फिर्याद घेताना त्यांच्यावर दबाव आणणाऱ्या आणि कलमात बदल करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी शुक्रवारी आंदोलन छेडणार असल्याचे एसएफआयचे अमोल वाघमारे म्हणाले.