ड्रेनेजचा आणखी एक बळी

By Admin | Updated: August 23, 2014 00:48 IST2014-08-23T00:08:10+5:302014-08-23T00:48:07+5:30

नांदेड ग्रामीण भागात ड्रेनेजच्या खड्डयात माती पडल्याने आणखी एका मजूराचा मृत्यू झाल्याची घटना घडली़

Another victim of Drainage | ड्रेनेजचा आणखी एक बळी

ड्रेनेजचा आणखी एक बळी

नांदेड :शहरातील देगलूर नाका भागात ड्रेनेजच्या खड्डयात काम करणाऱ्या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, नांदेड ग्रामीण भागात ड्रेनेजच्या खड्डयात माती पडल्याने आणखी एका मजूराचा मृत्यू झाल्याची घटना घडली़ त्यामुळे मनपाकडून मजूरांच्या सुरक्षिततेबाबत पावले उचलण्यात आली नसल्यामुळेच त्यांचे नाहक बळी जात आहेत़
देगलूर नाका भागात ड्रेनेजच्या खड्डयात उतरलेल्या दोन मजूरांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची घटना घडली होती़ स्वच्छतेचे काम करणाऱ्या मजूरांना गम बुट, हँडग्लोव्हज, हेल्मेट असे कोणतेच साहित्य देण्यात येत नाही़ २० आॅगस्ट रोजी फातिमा हायस्कुलजवळ दुर्गादास गौतम काळे रा़महंतवाडी चौफाळा हे ड्रेनेजच्या खड्डयात उतरले होते़ सेफ्टी प्लेट लावत असताना अचानक त्यांच्या अंगावर माती पडल्याने त्यांचा गुदमरुन मृत्यू झाला़ याप्रकरणी संदीत गौतम काळे यांनी पोलिसांना माहिती दिली़

Web Title: Another victim of Drainage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.