शहरात डेंग्यूचा आणखी एक बळी
By Admin | Updated: September 5, 2014 00:51 IST2014-09-05T00:24:11+5:302014-09-05T00:51:32+5:30
औरंगाबाद : डेंग्यूसदृश आजाराने न्यू हनुमाननगर गल्ली नं. १ मातोश्रीनगरमधील कल्याण राजपूत यांचा मृत्यू झाला आहे.

शहरात डेंग्यूचा आणखी एक बळी
औरंगाबाद : डेंग्यूसदृश आजाराने न्यू हनुमाननगर गल्ली नं. १ मातोश्रीनगरमधील कल्याण राजपूत यांचा मृत्यू झाला आहे. राजपूत हे बांधकाम व्यावसायिक होते. ३ सप्टेंबर रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास माणिक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला. वॉर्डामध्ये धूरफवारणी, फॉगिंग झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. डेंग्यूने आजवर १२ जणांचा बळी घेतला आहे. नागरी कृती समितीचे अध्यक्ष एल. डी. ताटू, विष्णू कुटे, देवीदास जाधव आदींनी पालिकेच्या आरोग्य विभाग व स्थानिक लोकप्रतिनिधींवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.