आणखी एक गुटखा विक्रेता पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:04 IST2021-04-15T04:04:27+5:302021-04-15T04:04:27+5:30

औरंगाबाद : ग्रामीण पोलिसांनी ११ लाखाचा, तर जिंसी पोलिसांनी २ लाख २० हजारांचा गुटखा जप्त करून २४ तास उलटत ...

Another gutkha seller was caught | आणखी एक गुटखा विक्रेता पकडला

आणखी एक गुटखा विक्रेता पकडला

औरंगाबाद : ग्रामीण पोलिसांनी ११ लाखाचा, तर जिंसी पोलिसांनी २ लाख २० हजारांचा गुटखा जप्त करून २४ तास उलटत असतानाच, आज मुकुंदवाडी परिसरातील विठ्ठलनगर येथील एका घरावर छापा टाकून पोलिसांनी १ लाख ८ हजार ३०० रुपयांचा गुटखा जप्त केला. या कारवाईत गुटखा विक्रेत्याला पोलिसांनी अटक केली. जयराज सुरजमल मेठी (४१) असे आरोपीचे नाव आहे.

मुकुंदवाडी ठाण्याच्या विशेष पथकाचे फौजदार अमोल म्हस्के हे गस्तीवर असताना विठ्ठलनगर येथील एका घरात गुटखा साठवून ठेवण्यात आल्याची माहिती खबऱ्याने त्यांना दिली. फौजदार म्हस्के, हवालदार बाबा कांबळे, शैलेंद्र अडियाल , मनोहर गिते, सुधाकर पाटील, श्याम आडे आणि अंबिका दारुंटे यांच्या पथकाने आज दुपारी संशयिताच्या घरावर छापा टाकला, तेव्हा तेथे लपवून ठेवलेला गुटख्याचा साठा आढळून आला. हा गुटखा १ लाख ८ हजार ३०० रुपयांचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीविरुध्द मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Another gutkha seller was caught