मोबाईल चोरांच्या आणखी एका टोळीचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:50 IST2017-09-11T00:50:57+5:302017-09-11T00:50:57+5:30
शहरासह जिल्हाभरात मोबाईल लंपास करणाºया अनेक टोळीचा आतापर्यंत भाग्यनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे़ शहरातील अंबिकानगर येथे रस्त्यावरुन जाणाºया एका युवकाचा मोबाईल चोरीस गेल्यानंतर तीन तासांत चोरट्याच्या मुसक्या आवळून आणखी एक टोळी उघडकीस आणली आहे़

मोबाईल चोरांच्या आणखी एका टोळीचा पर्दाफाश
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: शहरासह जिल्हाभरात मोबाईल लंपास करणाºया अनेक टोळीचा आतापर्यंत भाग्यनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे़ शहरातील अंबिकानगर येथे रस्त्यावरुन जाणाºया एका युवकाचा मोबाईल चोरीस गेल्यानंतर तीन तासांत चोरट्याच्या मुसक्या आवळून आणखी एक टोळी उघडकीस आणली आहे़
यापूर्वी भाग्यनगर पोलिसांनी मोबाईल चोरट्यांच्या अनेक टोळ्या पकडल्या आहेत़ त्यांच्याकडून हजारो मोबाईलही जप्त केले आहेत़ शहरातील अंबिका मंगल कार्यालय रस्त्यावरुन चंद्रकांत सुभाषराव मोरे (रा़साफल्यनगर) हे पायी जात होते़ त्यावेळी छत्रपती चौक येथे मोरे यांच्या पाठीमागे असलेल्या तिघांनी त्यांना धक्का दिला़ त्याचवेळी त्यांच्या खिशातील ९ हजार रुपये किमतीचा मोबाईल काढून घेतला़ ही बाब मोरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेच मागे वळून पाहिले़ मोबाईलचोरटा मागे सरकला आणि अन्य दोघे जण मोरे यांच्यासमोर आले़ मोरे यांनी मागील युवकाला मोबाईलबाबत विचारणा केली असता, तिघेही त्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावले़ त्यानंतर मोरे यांनी लगेच भाग्यनगर ठाण्यात धाव घेत पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार यांची भेट घेतली़ याप्रकरणी पोनि़ चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि पवार, सुभाष आलोने, वैजनाथ पाटील, सचिन गायकवाड यांनी सापळा रचून तीन तासांच्या आता विकी ऊर्फ चिकी सुखदेव पोटारे (रा़ जयभीमनगर) याला ताब्यात घेतले़
पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली़ तसेच टोळीतील इतर दोन साथीदारांची नावेही सांगितली़ सध्या हे दोन्ही आरोपी फरार आहेत़ अटक केलेला आरोपी हा सराईत चोरटा असून त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे़