पाणीपुरवठा योजनेसाठी आणखी २१ कोटींचा निधी
By Admin | Updated: August 14, 2014 02:08 IST2014-08-14T02:05:02+5:302014-08-14T02:08:34+5:30
परभणी: शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी युआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत पुन्हा महानगरपालिकेला शासनाकडून २१ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती महापौर प्रताप देशमुख यांनी दिली.

पाणीपुरवठा योजनेसाठी आणखी २१ कोटींचा निधी
परभणी: शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी युआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत पुन्हा महानगरपालिकेला शासनाकडून २१ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती महापौर प्रताप देशमुख यांनी दिली.
परभणी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी युआयडी- एसएसएमटी योजनेंतर्गत १९६ कोटी रुपयांची योजना मंजूर झाली आहे. या योजनेंतर्गत १० कोटी ५० लाख रुपयांची लोकवर्गणी पालिकेला भरावयाची असून आतापर्यंत पालिकेने जवळपास ४ कोटी ५० लाख रुपयांची लोकवर्गणी शासनाकडे जमा केली आहे.
या योजनेअंतर्गत आतापर्यंत ९० कोटी रुपये पालिकेला भेटले असून या निधीतून येलदरी ते परभणीपर्यंत पाईपलाईन टाकण्याचे काम झाले आहे. आता जलशुद्धीकरण केंद्र व शहरातील अंतर्गत पाईपलाईन टाकण्यासाठी पालिकेला निधीची आवश्यकता आहे. या अनुषंगाने पालिकेला निधी मिळावा, याकरीता नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व पालकमंत्री सुरेश धस, महापौर प्रताप देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत महापौर देशमुख यांनी पालिकेला निधीची तातडीने आवश्यकता असल्याचे सांगितले. त्या अनुषंगाने पालिकेला २१ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. हा निधी खर्च केल्यानंतर आणखी ३० कोटी रुपयांचा निधी महापालिकेस शासनाच्या वतीने देण्यात येणार असल्याचे महापौर प्रताप देशमुख यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
मिळालेल्या निधीतून होणारी कामे
पालिकेला प्राप्त झालेल्या २१ कोटी रुपयांच्या निधीतून जलशुद्धीकरण केंद्राचे बांधकाम, दोन जलकुंभ, अशुद्ध पाणीगुरुत्व वहिनी, अंतर्गत पाईपलाईन आदींची कामे होणार आहेत. तसेच जलकुंभासाठी गंगाखेड रोडवर उड्डाणपुलाजवळील जागा तसेच जलशुद्धीकरण केंद्रासाठी जिंतूर रोडवरील गोरक्षणाच्या जागेचा अधिग्रहाणासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत लवकरच शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. लवकरच सदरील जागा महापालिकेला हस्तांतरित होणार असल्याचे देशमुख म्हणाले.