शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

शेतकऱ्यांवर आणखी एक संकट, रब्बीच्या तोंडावरच रासायनिक खते महागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 16:05 IST

शेतकऱ्यांचा पिकांचा खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ बिघडलेलाच

- प्रशांत तेलवाडकर

औरंगाबाद : शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट व्हावे, अशी केंद्र सरकारची इच्छा असली तरी प्रत्यक्षात मात्र पिकांवर जेवढा खर्च केला तो सुद्धा निघताना दिसत नाही. नैसर्गिक संकटातून मार्ग काढत शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी केली पण आता पोटॅशसह अन्य रासायनिक खते महागल्याने नवीन संकट आले आहे. मुळात रासायनिक खतातील भाववाढ आधीच झाली असली तरी आता खताची मात्रा देण्याची वेळ आल्याने भाववाढीचा विषय ‘ऐरणी’वर आला आहे.

संयुक्त खताच्या किमती कडाडल्यासंयुक्त खते जुने दर नवीन दर (५० किलो)१०:२६:२६ ११७५ रु १४७० रु१२:३२:१६ ११८५ रु १४८० रु२४:२४:०० १२१० रु १७०० रु१५:१५:१५ १०७० रु १३५० रुपोटॅश             ९०० रु १७८० रु

रब्बी हंगामात जिल्ह्यात पेरणी१,६४,६४२.९९ सरासरी हेक्टर क्षेत्र१,२६,४९८.१० प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र७०.७६ टक्के एकूण झालेली पेरणीकोणत्या पिकासाठी लागते खत : गहू, बाजरी, मका, कांदा

युरिया, डीएपी स्थिर अन्य खताचे काय ?रब्बी पिकांना आता खत देण्याची वेळ आली आहे. खताचे दर वाढल्याने नवीन संकट निर्माण झाले आहे. एकरी खताच्या २ बॅग लागतात तर युरियाच्याही २ बॅग अशा ४ बॅग लागतात. केंद्र सरकारने युरिया व डीएपी या खतासाठी सबसिडी दिली आहे. बाकींच्या खतांचे काय? त्यांचे दर वाढतच आहेत. एकीकडे पिकांना लागणारा खर्च वाढत आहे. दुसरीकडे बाजारात धान्याचे दर मात्र त्या तुलनेत वाढत नाहीत. हेच दुखणे आहे.- शिवाजी ढाकणे, शेतकरी, लिंगदरी

पोटॅश महागल्याचा परिणामपोटॅशच्या किमती महागल्याने संयुक्त खतांच्या किमती वाढल्या आहेत. तशी ही भाववाढ चार महिन्यांपूर्वीची आहे. मध्यंतरी खताचे भाव कमी झाले ते सध्या टिकून आहेत. पण मागील वर्षीच्या तुलनेत सध्याचा दर दुप्पटच आहे. आता ऐन पेरणी व खताची मात्रा देण्याच्या वेळेस ‘भाववाढ’चा मुद्दा ऐरणीवर आला आहे.- राकेश सोनी, अध्यक्ष, कृषी निविष्ठा विक्रेता संघटना

रासायनिक खते, कीटकनाशकावरील जीएसटी रद्द करारासायनिक खतांचे भाव प्रचंड वाढले आहेत तसेच कीटकनाशकाचे भावही २० ते ३० टक्क्यांनी वधारले आहेत. केंद्र सरकारने ही भाववाढ रोखण्यासाठी आणखी उपाययोजना करावी. त्यात कीटकनाशकावर १८ टक्के तर रासायनिक खतावरील ५ टक्के जीएसटी रद्द करावा.- जगन्नाथ काळे, राज्यध्यक्ष, माफदा.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAurangabadऔरंगाबाद