शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
4
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
5
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
6
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
7
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
8
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
9
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
10
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
11
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
12
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
13
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
14
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
15
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
16
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
17
रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
18
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
19
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
20
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

विद्यापीठाने बोरा समितीनंतर त्याच मुद्द्यावर नेमली दुसरी समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 13:33 IST

व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीत हा वादग्रस्त विषय पुन्हा चर्चेला येणार, म्हणून बैठकीतील निर्णयाकडे विद्यापीठ वर्तुळात सर्वांचे लक्ष लागले होते.

औरंगाबाद : विद्यापीठातील तीन संवैधानिक अधिकाऱ्यांना ‘क्लीन चिट’ दिलेला निवृत्त न्यायाधीश पी.आर. बोरा समितीचा अहवाल व्यवस्थापन परिषदेच्या मागील बैठकीत बहुमताने फेटाळल्यानंतर, आज सोमवारी या अधिकाऱ्यांवरील आक्षेपांच्या तथ्यशोधनासाठी माजी कुलगुरू डॉ.सर्जेराव निमसे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नव्याने स्थापन करण्यात आली.

व्यवस्थापन परिषदेच्या आजच्या या बैठकीत हा वादग्रस्त विषय पुन्हा चर्चेला येणार, म्हणून बैठकीतील निर्णयाकडे विद्यापीठ वर्तुळात सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, या संदर्भात पुन्हा नव्याने चौकशी करण्यासाठी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.राजेश करपे, संजय निंबाळकर, डॉ.राहुल म्हस्के आदी सदस्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.सर्जेराव निमसे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ.विलास खंदारे व नरेंद्र काळे अशी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्याचा मुद्दा मांडला. त्यास राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे व काही सदस्यांनी कडाडून विरोध केला. याच सभागृहाने न्या.बोरा समिती नेमली. त्यानुसार, त्यांनी चौकशी करून विद्यापीठाला अहवाल सादर केला व मनासारखा अहवाल आला नाही, म्हणून तो बहुमताच्या बळावर फेटाळण्यात आला. आता एका उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तीवर अविश्वास व्यक्त करून पुन्हा त्याच मुद्द्यावर दुसरी चौकशी समिती नेमणे, ही बाब चुकीची आहे, असा मुद्दा शितोळे यांनी मांडला, तर कुलगुरू डॉ.येवले यांनी बोरा समितीचा अहवाल फेटाळल्यामुळे व्यवस्थापन परिषदेच्या या निर्णयाला संवैधानिक अधिकाऱ्यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना नवीन समिती स्थापन करता येणार नाही, हे सभागृहाच्या निदर्शनात आणून दिले. त्यानंतरही सभागृहाने बहुमताने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस उच्चशिक्षण संचालक डॉ.धनराज माने, प्रकुलगुरू डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी व सदस्य उपस्थित होते.

एप्रिलमध्ये दीक्षांत समारंभाची तयारीविद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रघुनाथ माशाळकर, परम महासंगणकाचे जनक पद्मश्री डॉ.विजय भटकर किंवा के.कस्तुरीरंगन या तिघांपैकी जे कार्यक्रमासाठी येऊ शकतात, त्यांना निमंत्रित करावे, असा निर्णय झाला. हा समारंभ एप्रिलअखेरपर्यंत घेण्याचे विद्यापीठाचे नियोजन आहे. या शिवाय या बैठकीत सन २०१९-२० या आर्थिक वर्षातील वार्षिक लेखे, वार्षिक अहवाल, तसेच सन २०२१-२०२२ या वर्षाचा अर्थसंकल्प अधिसमोर मांडण्यास मान्यता देण्यात आली. यंदाच्या परीक्षा ऑफलाइन आणि ऑनलाइन या दोन्ही पद्धतीने घेण्याचा विद्यापीठाचा प्रस्ताव मान्य करण्यात आला.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण