गंगाखेडच्या बसस्थानकावर आणखी एकास पकडले
By Admin | Updated: August 20, 2014 00:23 IST2014-08-20T00:10:49+5:302014-08-20T00:23:42+5:30
हिंगोली : एका आरोपीस १९ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजता परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे बसस्थानकावर अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक हबीब खान यांनी दिली.

गंगाखेडच्या बसस्थानकावर आणखी एकास पकडले
हिंगोली : आदिलाबादकडून अकोल्याकडे जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वेवर दरोडा टाकून लूटमार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या एका आरोपीस १९ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजता परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे बसस्थानकावर अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक हबीब खान यांनी दिली.
१७ आॅगस्ट रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास पुर्णा-अकोला लोहमार्गावरील बोल्डा ते नांदापूर रेल्वेस्थानकादरम्यान धावत्या रेल्वेमध्ये सहा युवकांनी धारदार शस्त्राने महिला व पुरूष प्रवाशांना मारहाण करून त्यांच्याजवळील सोन्याचे दागिणे, रोख रक्कम व मोबाईल असा एकूण २ लाख १० हजाराचा ऐवज पळविला. या प्रकरणी राहुल भरतलाल राठौर यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरूध्द नांदेडच्या रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. यातील आरोपी संदेश उर्फ शिवा पटले (रा.चंद्रपूर), शेख गफार शेख बाबू, रफीक उर्फ बाबा, मुंजाजी उर्फ पगली (सर्व रा.परभणी) यांना हिंगोली पोलिसांच्या संयुक्त पथकाने कोम्बिग आॅपरेशन हाती घेऊन अटक केली. तसेच त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या शस्त्रांसह १८ हजार ६८५ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या चारही आरोपींना न्यायालयाने २२ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील दोन फरार आरोपींचा शोध सुरू होता. एक आरोपी परभणी जिल्हातील गंगाखेड येथे असल्याची माहिती मिळाल्याने नांदेड रेल्वेचे पोलीस उपनिरीक्षक हबीब खान, सपोउपनि राठोड, पोना नंदू नारनवरे, पोकॉ हेमंत निंबरगे यांच्या पथकाने त्याठिकाणी छापा टाकला. या कारवाईमध्ये आरोपी शेख युसूफ शेख बाबू (२५, रा.शंकरनगर परभणी) यास अटक करण्यात आली असल्याचे फौजदार खान यांनी सांगितले. (प्रतिनिधी)