बोगस कार्डप्रकरणी आणखी एक जण ताब्यात

By Admin | Updated: February 16, 2015 00:52 IST2015-02-16T00:45:16+5:302015-02-16T00:52:25+5:30

लातूर : एस.टी. तील प्रवास सवलतीच्या बोगस कार्ड प्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलिसांनी दोघांना अटक केली होती. आता आणखी एकास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Another bogus card holder | बोगस कार्डप्रकरणी आणखी एक जण ताब्यात

बोगस कार्डप्रकरणी आणखी एक जण ताब्यात


लातूर : एस.टी. तील प्रवास सवलतीच्या बोगस कार्ड प्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलिसांनी दोघांना अटक केली होती. आता आणखी एकास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
एस.टी. महामंडळाच्या वतीने अपंगांसाठी प्रवास सवलतीची योजना आहे. मात्र या योजनेत अनेकांनी बोगस पासेस काढले आहेत. या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर एस.टी. महामंडळाच्या पथकाने बोगस कार्ड ताब्यात घेऊन दोघा जणांवर गुन्हा दाखल केला. शिवाजी नगर पोलिसांनी बबन ज्ञानदिप मिस्कील (रा़बाभळगाव, ता़लातूर) व दिनकर श्रीनिवास गादेवार (रा़हाडोळती, ता़अहमदपूर) या दोघांना अटक करून त्यांच्या जवळील बनावट कार्ड जप्त केले़ आता हे दोघेजण न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणात आणखीन एकाला शिवाजी नगर पोलिस ठाण्याचे एएसआय ए.एन. बदणे यांनी ताब्यात घेतले आहे. त्याचा तपास सुरू आहे.
दरम्यान, एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयाच्या वतीने बोगस कार्डधारकावर कारवाई करण्याची मोहीम सुरूच आहे. प्रत्येक मार्गावर तपासणी करण्यात येत आहे. ज्या प्रवाशांकडे कार्ड आहे, ते कार्ड बनावट नसल्याची खात्री करून घेण्यासाठी तीन पथके कार्यान्वित आहेत. दररोज या पथकाकडून बसेसमध्ये तपासणी करण्यात येत असल्याची माहिती विभाग नियंत्रकांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Another bogus card holder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.