सफारी पार्कसाठी आणखी ५० एकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 01:06 IST2017-08-24T01:06:39+5:302017-08-24T01:06:39+5:30
: महानगरपालिकेला सफारी पार्कसाठी १०० एकर जागा देण्यात आल्यानंतर आता पुन्हा ५० एकर जागा देण्यात येणार असून, या जागेच्या मोजणीचा प्रस्ताव तहसील कार्यालयाने भूमिअभिलेख कार्यालयाला पाठविला आहे, अशी माहिती अपर तहसीलदार रमेश मुंदलोड यांनी दिली.

सफारी पार्कसाठी आणखी ५० एकर
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महानगरपालिकेला सफारी पार्कसाठी १०० एकर जागा देण्यात आल्यानंतर आता पुन्हा ५० एकर जागा देण्यात येणार असून, या जागेच्या मोजणीचा प्रस्ताव तहसील कार्यालयाने भूमिअभिलेख कार्यालयाला पाठविला आहे, अशी माहिती अपर तहसीलदार रमेश मुंदलोड यांनी दिली. मिटमिटा येथे सफारी पार्क उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महापालिकेला १०० एकर जागा या पूर्वीच दिली आहे. त्यामध्ये आणखी ५० एकर जागेची भर पडणार आहे. जिल्हा नियोजन समितीतून १०० एकर जागेवर सुरक्षाकुंपण तयार करण्यासाठी निधीही देण्यात आला आहे.
पालिकेने सफारी पार्कसाठी आणखी ५० एकर जागेची आवश्यकता असल्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती.
त्यासाठी जागा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरूकेल्या. मिटमिटा येथील ५० एकर जमीन मोजणीसाठी तहसील विभागाकडून भूमिअभिलेख कार्यालयाला पत्र पाठविण्यात आले आहे.
जमिनीची मोजणी झाल्यानंतर ही जमीन महापालिकेला हस्तांतरित करणे शक्य होऊ शकते. सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात जागा अपुरी पडत असल्याने बºयाच दिवसांपासून हे प्राणिसंग्रहालय इतरत्र हलविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मिटमिटा येथे होणाºया सफारी पार्कसाठी १०० एकर जागा यापूर्वीच महापालिकेच्या ताब्यात देण्यात आली असून तेथे गेल्या महिन्यात वृक्षारोपणही करण्यात आले
आहे.