नगरपंचायतींचे आरक्षण जाहीर
By Admin | Updated: August 21, 2015 00:43 IST2015-08-21T00:13:20+5:302015-08-21T00:43:48+5:30
बीड : वडवणी, शिरुर, आष्टी, पाटोदा या चार नगरपंचायतींमधील प्रभागरचना गुरुवारी ठिकठिकाणच्या तहसील कार्यालयांत निश्चित करण्यात आली.

नगरपंचायतींचे आरक्षण जाहीर
बीड : वडवणी, शिरुर, आष्टी, पाटोदा या चार नगरपंचायतींमधील प्रभागरचना गुरुवारी ठिकठिकाणच्या तहसील कार्यालयांत निश्चित करण्यात आली. एकूण ६८ नगरसेवकांपैकी ३६ जागांवर महिला नगरसेविका हमखासच निवडून जाणार आहेत. ऐन दिवाळीत निवडणुकांचा धुराळा उडण्याची शक्यता आहे. आरक्षणाने काही ठिकाणी मातब्बरांची अडचण झाली आहे.
जुलै महिन्यात तालुक्यांचे ठिकाण असलेल्या चार ग्रामपंचायतींना नगरपंचायतींचा दर्जा प्राप्त झाला होता. यापूर्वी केज येथे नगरपंचायत मंजूर झालेली आहे. नगरपंचायतींची घोषणा झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत निवडणूक प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. मतदानाचा कार्यक्रम अद्याप निश्चित नाही. मात्र, दिवाळीमध्येच निवडणुकांमधील आरोप- प्रत्यारोपांचे फटाके फुटण्याची शक्यता आहे.
दरम्यान, चार नगरपंचायतींमध्ये प्रत्येकी १७ नगरसेवकांच्या जागा आहेत. प्रत्येक नगरपंचायतीत ९ महिला हमखासच नगरसेविका होणार आहेत. नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अद्याप जाहीर नाही. या आरक्षणाकडे आता नगरपंचायत हद्दीतील मतदारांचे लक्ष वेधले आहे. (प्रतिनिधींकडून)