पोलिस भरतीची अंतिम यादी जाहीर
By Admin | Updated: June 21, 2014 00:56 IST2014-06-21T00:00:32+5:302014-06-21T00:56:42+5:30
नांदेड: जिल्हा पोलिस दलात ७२ जागांसाठी घेण्यात आलेल्या पोलिस भरतीची लेखी परीक्षेनंतर अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे़ यापूर्वी तात्पुरती यादी जाहीर करुन आक्षेप मागविण्यात आले होते़
पोलिस भरतीची अंतिम यादी जाहीर
नांदेड: जिल्हा पोलिस दलात ७२ जागांसाठी घेण्यात आलेल्या पोलिस भरतीची लेखी परीक्षेनंतर अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे़ यापूर्वी तात्पुरती यादी जाहीर करुन आक्षेप मागविण्यात आले होते़
पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर ६ जूनपासून पोलिस भरतीला सुरुवात झाली होती़ त्यात १५ जून रोजी पात्र ठरलेल्या ८०२ उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली़
यामध्ये विविध संवर्गनिहाय निवड केलेल्या उमेदवारांची तात्पुरती यादी १६ जून रोजी जाहीर करण्यात आली होती़ त्यावर आक्षेपही मागविण्यात आले होते़ परंतु कोणतेही आक्षेप न आल्यामुळे १६ जून रोजीच्या यादीमध्ये कोणताही बदल न करता तीच यादी अंतिम करण्यात आली आहे़ तसेच जिल्हा पोलिस दलाच्या संकतेस्थळावरही अंतिम यादी पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे़
निवड झालेल्या उमेदवारांनी वैद्यकीय तपासणी व चारित्र्य पडताळणीचे अर्ज भरुन देण्याकरिता मूळ कागदपत्रांसह पोलिस अधीक्षक कार्यालयातील चिंतन सभागृहात २३ जून रोजी सकाळी ११ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक परमजितसिंह दहिया यांनी केले आहे़
त्याचबरोबर भरतीची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडल्याबद्दल कर्मचारी व अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे़ या सर्व भरतीप्रक्रियेवर सीसी- टीव्हीची नजर होती़ त्यात पोलिस दलाने भरतीसाठी केलेली तयारीही वाखाणण्याजोगी होती़ (प्रतिनिधी)