डीसीसीच्या सभासदांची अंतिम यादी जाहीर

By Admin | Updated: March 26, 2015 00:57 IST2015-03-26T00:36:13+5:302015-03-26T00:57:33+5:30

बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून बँकेच्या अंतिम सभासदाची यादी बुधवारी प्रसिध्द करण्यात आली आहे

Announcing the final list of DCC members | डीसीसीच्या सभासदांची अंतिम यादी जाहीर

डीसीसीच्या सभासदांची अंतिम यादी जाहीर


बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून बँकेच्या अंतिम सभासदाची यादी बुधवारी प्रसिध्द करण्यात आली आहे. एक हजार २४ सभासद पात्र ठरले आहेत. ज्या संस्था थकबाकीदार आहेत त्यांना या यादीतून वगळण्यात आले आहेत.
विविध घोटाळ्यांनी गाजलेल्या बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लागली आहे. या प्रकरणी पहिल्या टप्प्यात विभागीय सहनिबंधकांनी बँकेच्या सभासदांची अंतिम यादी २५ मार्च रोजी जाहीर केली आहे. यामध्ये एक हजार ४२४ सभासद नमूद आहेत. यामध्ये ६९९ सेवा संस्था, ५२८ इतर शेती संस्था, ६५ प्रक्रिया संस्था आणि १३२ पगार संस्था यांचा समावेश आहे.
यापूर्वी बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तब्बल २६०० सभासद होते. मात्र, हा आकडा आता निम्म्यावर येऊन पोहचला असून, ही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Announcing the final list of DCC members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.