पंचायत समिती सभापतींच्या आरक्षणाची सोडत जाहीर
By Admin | Updated: June 28, 2014 01:20 IST2014-06-28T00:54:33+5:302014-06-28T01:20:13+5:30
औरंगाबाद : आगामी अडीच वर्षांसाठी जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतींच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी जाहीर झाली. सोडतीदरम्यान इच्छुकांमध्ये ‘कहीं खुशी कहीं गम’ असे वातावरण बघायला मिळाले.

पंचायत समिती सभापतींच्या आरक्षणाची सोडत जाहीर
औरंगाबाद : आगामी अडीच वर्षांसाठी जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतींच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी जाहीर झाली. सोडतीदरम्यान इच्छुकांमध्ये ‘कहीं खुशी कहीं गम’ असे वातावरण बघायला मिळाले. ९ पैकी ७ सभापतींची पदे विविध प्र्रवर्ग आणि महिलांसाठी राखीव झाली. त्यामुळे सभापतीपदाचे अनेकांचे मनसुबे धुळीला मिळाले. सोडतीमुळे हिरमोड झालेल्या काही जणांनी अर्ध्यातूनच सभागृहातून काढता पाय घेतला. दुसरीकडे ज्यांच्या पंचायत समितींचे पद अराखीव राहिले त्यांच्या चेहऱ्यांवरचा आनंद ओसंडून वाहत होता.
जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांच्या सभापतींची मुदत सप्टेंबरमध्ये संपत आहे. त्यामुळे येत्या अडीच वर्षांच्या कालावधीसाठी आज सभापतीपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी किसनराव लवांडे, उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके आणि संभाजी अडकुणे यांच्या उपस्थितीत ही सोडत निघाली. यावेळी पंचायत समित्यांमधील इच्छुक सदस्य आणि त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी पैठण पंचायत समिती सभापतींची ज
ागा आरक्षित करण्यात आली. सर्व तालुक्यातील अनुसूचित जातींची संख्या विचारात घेऊन हे आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यानंतर अनुसूचित जमातीची लोकसंख्या आणि याआधीचे आरक्षण या दोन्ही गोष्टी विचारात घेऊन या प्रवर्गासाठी कन्नडची जागा राखीव केल्याचे जाहीर करण्यात आले. यानंतर चिठ्ठ्या टाकून ओबीसी प्रवर्गासाठी वैजापूर आणि फुलंब्री या दोन जागा निश्चित करण्यात आल्या. यातील फुलंब्रीची जागा ओबीसी महिलांसाठी राखीव ठरली. उर्वरित पाचपैकी तीन जागा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव करावयाच्या होत्या. त्यासाठी पुन्हा चिठ्ठ्या टाकण्यात आली. तेव्हा सोयगाव, खुलताबाद आणि सिल्लोडचे सभापतीपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी गेले आहे.
औरंगाबाद आणि गंगापूरची सभापती पदे ही सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी सुटली आहेत. सोडतीदरम्यान उपस्थितांच्या चेहऱ्यावर कधी आनंद, तर कधी नाराजी दिसून आली. सभापतीपद दुसऱ्या प्रवर्गाला सुटल्यानंतर अनेक इच्छुकांनी सभागृहातून लगेच काढता पाय घेतला.
पंचायत समिती सभापतींचे प्रवर्गनिहाय आरक्षण
पैठण एससी (महिला)
कन्नड एसटी
फुलंब्री ओबीसी (महिला)
वैजापूर ओबीसी
सोयगाव खुला (महिला)
खुलताबाद खुला (महिला)
सिल्लोड खुला (महिला)
गंगापूर खुला
औरंगाबाद खुला