वर्धापनदिनीच ‘काळा’ दिवस
By Admin | Updated: December 9, 2014 01:01 IST2014-12-09T00:50:00+5:302014-12-09T01:01:44+5:30
औरंगाबाद : महापालिकेतील चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांनी ८ डिसेंबर हा वर्धापन दिन काळा दिवस म्हणून साजरा केला. १५ वर्षांपासून सेवापुस्तिका मिळत नाहीत.

वर्धापनदिनीच ‘काळा’ दिवस
औरंगाबाद : महापालिकेतील चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांनी ८ डिसेंबर हा वर्धापन दिन काळा दिवस म्हणून साजरा केला. १५ वर्षांपासून सेवापुस्तिका मिळत नाहीत. या वर्धापनदिनी पुस्तिका द्याव्यात, अशी कर्मचाऱ्यांची मागणी होती; मात्र प्रशासनाने पुस्तिका प्रदान केल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांनी हे आंदोलन केले.
१,१२४ नोकर भरतीतील ५६४ कर्मचाऱ्यांना सेवापट व परिविक्षाधीन कालावधी खुला करण्याचा निर्णय होऊन वर्ष झाले आहे.
त्यासाठी नेमलेल्या समितीचे काम काही महिन्यांपासून ठप्प पडले असून सेवापुस्तिकांसाठी प्रत्येक कर्मचाऱ्याकडून ५ हजार रुपयांची मागणी मध्यस्थ करीत असल्याची चर्चा पालिकेत आहे. याप्रकरणी समिती सदस्यांशी संपर्क केला असता, त्यावर कुणीही बोलण्यास तयार नाही.
आयुक्तांनी ९ जणांची विशेष समिती सेवापुस्तिकांसाठी ४ जानेवारी २०१४ रोजी गठित केली. आठ दिवसांत समिती त्याबाबत अहवाल सादर करील, असे तत्कालीन आयुक्त डॉ.कांबळे यांनी आदेशात म्हटले होते. २००७ साली गठित केलेल्या समितीच्या अहवालावरून ५६४ कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची छाननी विद्यमान समिती ११ महिन्यांपासून करीत आहे.
ही आहे समिती...
उपमुख्य लेखापरीक्षक महावीर पाटणी, एस. पी. काचावार, बी. बी. साळवे, मधुकर गंगावणे, गोविंद बारबोटे यांच्याकडे १२२ बनावट टीसी असलेले व २६२ सेवापुस्तिका दिलेल्या कर्मचाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधी खुला करण्याचे काम आहे.
दुसऱ्या समितीमध्ये सहायक आयुक्त रोशन मकवाने, अभय प्रामाणिक, रझा अली, विलास भणगे यांचा समावेश आहे. ही समिती नावात फरक असलेल्या १७४ कर्मचाऱ्यांच्या मूळ आदेशानुसार सेवापट तयार करून परिविक्षाधीन कालावधी खुला करण्यासाठी कागदपत्रांची छाननी करण्याचे काम ११ महिन्यांपासून करीत आहे.४
१,१२४ पैकी ५६४ मजुरांना सेवापुस्तिका दिलेल्या नाहीत; त्यांच्यापैकी ज्यांची कागदपत्रे तपासणीअंती योग्य असतील त्यांचा परिविक्षाधीन कालावधी खुला होईल. त्यामुळे त्यांना वार्षिक वेतनवाढ, वैद्यकीय रजा, किरकोळ रजा, मासिक रजा, बँक लोन, वरिष्ठ वेतनश्रेणी, पेन्शन मिळू शकेल. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पदरी वेतनेतर थकबाकीपोटी ५० ते ६० हजार रुपये पडतील.