नोटाबंदीची वर्षपूर्ती : डावी आघाडी उतरली रस्त्यावर, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केली निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 00:45 IST2017-11-09T00:45:05+5:302017-11-09T00:45:05+5:30
नोटाबंदी, फसवी कर्जमाफी, पेट्रोल- डिझेलचे वाढलेले भाव, विविध समाजाच्या आरक्षणाकडे शासनाने केलेले दुर्लक्ष या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे जनआक्रोश आंदोलन केले़

नोटाबंदीची वर्षपूर्ती : डावी आघाडी उतरली रस्त्यावर, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केली निदर्शने
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : नोटाबंदी, फसवी कर्जमाफी, पेट्रोल- डिझेलचे वाढलेले भाव, विविध समाजाच्या आरक्षणाकडे शासनाने केलेले दुर्लक्ष या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे जनआक्रोश आंदोलन केले़
नांदेड जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त केंद्र व राज्य सरकारच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व माजी राज्यमंत्री आ.डी.पी.सावंत, महानगराध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर, आ.वसंतराव चव्हाण व जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी केले.
शासनाविरोधात तब्बल दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील वाहतूक पोलिसांनी इतर रस्त्याने वळविली. यावेळी आ.डी.पी. सावंत, आ.अमरनाथ राजूरकर, आ.वसंतराव चव्हाण, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, माजी आ. रोहिदास चव्हाण, सुमती व्याहाळकर, माजी महापौर अब्दुल सत्तार, नामदेवराव केशवे यांच्यासह अनेक वक्त्यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या जनविरोधी भूमिकेवर कडाडून हल्ला चढविला.
शेतकºयांची फसवी कर्जमाफी, धनगर व मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात शासनाने केलेले दुर्लक्ष, जीएसटी, नोटाबंदीचे झालेले दुष्परिणाम यामुळे सामान्य जनता हैराण झाल्याचे सांगण्यात आले.
आंदोलनात जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शांताबाई जवळगावकर, महापौर शीलाताई भवरे, माजी आ. हणमंतराव पा. बेटमोगरेकर, बी. आर. कदम, माजी आ. ईश्वरराव भोसीकर, रोहिदास चव्हाण, रावसाहेब अंतापूरकर, माधवराव पा. जवळगावकर, दिलीप पा.बेटमोगरेकर, शैलजा स्वामी, उपमहापौर विनय गिरडे, आनंदराव चव्हाण, मसूद अहेमद खान, माधवराव मिसाळे, शीला निखाते, प्रकाश भोसीकर, मंगलाताई धुळेकर, मंगलाताई निमकर, अनिताताई हिंगोले, सुमती व्याहाळकर, शमीम अब्दुला, गंगाधर सोंडारे, कविता कळसकर, प्रा. किशनराव किनवटकर, बलवंतसिंघ गाडीवाले, विरेंद्र्रसिंघ गाडीवाले, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, कोषाध्यक्ष विजय येवनकर, संतोष पांडागळे, राजन देशपांडे, बाळासाहेब देशमुख बारडकर, किशोर स्वामी, भगींदरसिंग घडीसाज, रवींद्र्रसिंघ बुंगई, मारोती पटाईत, गिरीधर डाके, डॉ.एन. के. सरोदे, श्रीकांत गुंजकर, नारायण श्रीमनवार, उमाकांत पवार, डॉ.विश्वास कदम, आनंदराव गुंडले, नारायण कोलंबीकर, आनंद भंडारे, शेषराव चव्हाण, भगवान दंडवे, भीमराव कल्याणे आदींचा सहभाग होता़