अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 21:42 IST2019-05-14T21:42:04+5:302019-05-14T21:42:11+5:30
रांजणगाव शेणपुंजी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची मंगळवारी उत्साहात सांगता करण्यात आली.

अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची मंगळवारी उत्साहात सांगता करण्यात आली.
शिवनेरी कॉलनीतील शिक्षकनगरमध्ये अखंड हरिनाम सप्ताहनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सप्ताहात दररोज हरिकिर्तन, हरीजागर, ज्ञानेश्वरी पारायण, समाज प्रबोधन इत्यादी धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. आज मंगळवारी सकाळी ह.भ.प.सुधाकर महाराज वाघ यांचे काल्याचे किर्तन झाले.
यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला रांजणगाव, जोगेश्वरी, घाणेगाव, विटावा, करोडी आदी भागातील भाविकांनी गर्दी केली होती. सप्ताह यशस्वीतेसाठी माधव पा.कावरखे, विजय बुनगाळे, गणेश सरवर, दत्तात्र्य कोटलवार, किरण मोहिते व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.