जिल्ह्यात जनावरांचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:26 IST2020-12-17T04:26:06+5:302020-12-17T04:26:06+5:30

औरंगाबाद ः जिल्ह्यात ५ लाख ७० हजार जनावरांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी लाळ खुरकूत लसीकरण ५ लाख ५४ ...

Of animals in the district | जिल्ह्यात जनावरांचे

जिल्ह्यात जनावरांचे

औरंगाबाद ः जिल्ह्यात ५ लाख ७० हजार जनावरांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी लाळ खुरकूत लसीकरण ५ लाख ५४ हजार ६९३ जनावरांना करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील ९७ टक्के लसीकरण पूर्ण झाले असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. सुरेखा माने यांनी सांगितले.

---

३१ टक्के जनावरांची टॅगिंग

---

औरंगाबाद ः जिल्ह्यात ६ लाख ७६ हजार १८० जनावरे आहे. त्या जनावरांची माहिती अपटेड ठेवण्यासाठी टॅगिंग करण्याचे काम पशू चिकित्सालयांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आतापर्यंत १ लाख ७७ हजार १८८ जनावरांना बिल्ले लावण्यात आले असून त्यांची इत्यंभूत माहिती ऑनलाईन केल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.

----

लंपी स्किनचा प्रादुर्भाव घटला

---

औरंगाबाद ः जनावरांमध्ये लंपी स्किनच्या विषाणू संक्रमणामुळे पशुपालकात चिंतेचे वातावरण होते. मात्र, जिल्ह्यात जनजागृती, योग्य हाताळणी केल्याने लंपी स्किनचा प्रादुर्भाव कमी झाला असून सध्या एकही जनावर संशयित नाही. त्यामुळे जिल्ह्यातून लंपी हद्दपास झाल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. सुरेखा माने यांनी सांगितले.

Web Title: Of animals in the district