जनावरांचा बाजारही फुलेना..

By Admin | Updated: July 13, 2017 00:45 IST2017-07-13T00:42:46+5:302017-07-13T00:45:34+5:30

बीड : पाऊस हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत असून त्यांच्यात नैराशाचे, चिंतेचे वातावरण पसरत आहे.

Animal market flows | जनावरांचा बाजारही फुलेना..

जनावरांचा बाजारही फुलेना..

सतीश जोशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : पाऊस हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत असून त्यांच्यात नैराशाचे, चिंतेचे वातावरण पसरत आहे. याचा परिणाम दैनंदिन व्यवहारावर होत असून बाजारपेठेत शुकशुकाट आहे. जवळपास १९५२ पासून भरत असलेल्या हिरापूरच्या (ता. गेवराई) जनावरांच्या बाजारात मंगळवारी फेरफटका मारला असता त्याचा परिणाम जाणवला. नेहमीच्या तुलनेत निम्माही बाजार फुलला नव्हता.
बीड जिल्ह्यात हिरापूर, नेकनूर हे जनावरांच्या बाजारासाठी मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. मराठवाडाबाहेरील व्यापारीही जनावरे घेऊन येत असतात. जनावरांच्या खरेदी-विक्रीतून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असते. कधी कधी तर जनावरे बांधायलाही जागा मिळत नाही, इतका प्रतिसाद मिळत असतो. विविध जातीचे बैल, गायी, म्हैस, शेळ्या या बाजारात खरेदी-विक्रीसाठी येत असतात. परंतु, गेल्या एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे उगवलेले पिक करपण्याच्या मार्गावर असल्याने दुबार पेरणीचे संकट घोंगावतय. त्यामुळे व्यवहार मंदावले आहेत.

Web Title: Animal market flows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.