पशुसंवर्धनचा कारभार रिक्त पदांनी खालावला
By Admin | Updated: May 19, 2015 00:50 IST2015-05-19T00:04:55+5:302015-05-19T00:50:48+5:30
व्यंकटेश वैष्णव, बीड एकीकडे जिल्ह्ययात मोठ्या प्रमाणात दुष्काळ आहे. शेतकऱ्यांसाठी विविध उपाय योजना राबविणाऱ्या कार्यालयाकडेच शासन दुर्लक्ष करत आहे

पशुसंवर्धनचा कारभार रिक्त पदांनी खालावला
व्यंकटेश वैष्णव, बीड
एकीकडे जिल्ह्ययात मोठ्या प्रमाणात दुष्काळ आहे. शेतकऱ्यांसाठी विविध उपाय योजना राबविणाऱ्या कार्यालयाकडेच शासन दुर्लक्ष करत आहे. येथील जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात ११ पैकी ७ पदे रिक्त आहेत. पशुसंवर्धन उपायुक्त (प्रभारी) यांच्यासह केवळ तीन जणांवरच कार्यालयाचा कारभार चालत आहे.
शेतकऱ्यांनसाठी शासन विविध योजना जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाच्या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र प्रत्यक्षात मनुष्यबळाचा आभाव असल्याने योजना शेवटच्या लाभार्थ्यांपर्यत पोहोचते का? याचा ‘फिडबॅक’ घेण्यासाठी देखील अधिकारी, कर्मचारी नसल्याचे वास्तव बीड पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात पहावयास मिळते.
तांत्रिक कर्मचाऱ्यांना कारकुनी कामे
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात ११ पैकी ७ च्या जवळपास जागा रिक्क आहेत. येथे कार्यरत असलेल्या दोन टेक्नीकलच्या कर्मचाऱ्यांनाच कारकूनी कामे करावी लागतात. एवढेच नाही तर प्रभारी उपायुक्तांना देखील कर्मचाऱ्यांची कामे करावी लागत आहेत.
२५ ते ३० योजनांचा भार..
संबंधीत कार्यालयाकडून शेतकऱ्यांसाठी २५ ते ३० योजना आज स्थितीत राबविल्या जातात. या योजना राबविण्यासाठी मात्र मनुष्यबळाचा आभाव असल्याने योजना बारगळण्याची शक्यता आहे.