शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्यांदाच पशुगणनेत भटक्या प्राण्यांचाही समावेश; डिजिटल स्वरूपात माहितीचे संकलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 16:40 IST

पशुगणनेची तीन महिन्यांची प्रक्रिया; जनावरांच्या १६ प्रजाती व कुक्कुट पक्ष्यांची माहिती संकलित

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात २१ व्या पशुगणनेला सुरुवात झाली आहे. मोबाइल ॲपचा वापर करून या गणनेची माहिती डिजिटल स्वरूपात संकलित केली जात आहे. पशुगणनेत आतापर्यंत शेतकऱ्यांकडील पाळीव पशूंचाच विचार केला जात होता; मात्र गेल्या काही दिवसांत भटक्या जनावरांचे प्रमाण वाढले आहे. त्या जनावरांची नोंद झाली, तर आकडेवारीमध्ये पारदर्शकता येईल तसेच पुढे योग्य ते धोरण राबविणे शक्य होणार आहे. त्यानुसार या पशुगणनेत पाळीव प्राण्यांसोबत भटक्या प्राण्यांची देखील जाती, उपजातींची, लिंग, वयाची नोंद केली जात आहे.

पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत मोबाइल ॲपच्या माध्यमातून ही पशुगणना केली जात आहे. दुग्ध उत्पादक शेतकरी, पशुपालकांनी पशुगणना करण्यासाठी येणाऱ्या प्रगणकांना आपल्याकडील पशूंची अचूक आणि योग्य माहिती द्यावी. पशुगणनेच्या माध्यमातून राज्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील कुटुंब, कौटुंबिक उपक्रम, बिगर कौटुंबिक उपक्रम आणि संस्था, गोशाळा यांच्याकडे असलेल्या जनावरांच्या १६ प्रजाती व कुक्कुट पक्षी यांची जातीनिहाय, वयोगट तसेच लिंगनिहाय आकडेवारी गोळा केली जात आहे. शेतकरी, पशुपालकांकडील पाळीव पशुधन, उद्योग, संस्था, संघटनांच्यावतीने पाळलेल्या गायवर्गीय, म्हैसवर्गीय पशूंसह मेंढी, शेळी, वराह, घोडा, शिंगरू, खेचर, गाढव, उंट, कुत्रा, ससा, हत्ती तसेच कोंबडी, बदक, टर्की, लहान पक्षी, शहामृग व इमू यांसारखे कुक्कुट पक्षी याव्यतिरिक्त भटकी कुत्री, भटक्या गाई आणि भटका पशुपालक समुदाय यांचीदेखील माहिती संकलित करण्यात येत आहे.

फेब्रुवारीपर्यंत चालणार पशुगणनासन १९१९ पासून आतापर्यंत एकूण २० वेळा पशुगणना करण्यात आली आहे. यापूर्वी २०१९ मध्ये पशुगणना करण्यात आली होती. आता २५ नोव्हेंबरपासून २१ व्या पशुगणनेची प्रक्रिया सुरू झाली असून ती फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या पशुगणनेसाठी जिल्ह्यात २५६ प्रगणक आणि ४९ पर्यवेक्षक तैनात करण्यात आले आहेत. ग्रामीण भागात ३ हजार कुटुंबांमागे १ प्रगणक आणि ५ प्रगणकांमागे १ पर्यवेक्षक, तर शहरी भागात ४ हजार कुटुंबांमागे १ प्रगणक आणि १० प्रगणकांमागे १ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आलेले आहेत.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरcowगाय