शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रिणीसोबत बोलल्याचा राग, बारावीतल्या मुलाचे अपहरण; बेदम मारहाणीनंतर १२ तासांनी सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 11:56 IST

महाविद्यालयातील अल्लड भावना, ईर्षा आणि वाद : लोखंडी रॉड, बेल्टने शरीर सुजेपर्यंत मारहाण

छत्रपती संभाजीनगर : एकतर्फी प्रेम असलेल्या मुलीसोबत बोलल्याच्या रागातून बारावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय मुलाचे तिघांनी तब्बल १२ तास अपहरण केले. देवळाईच्या पुढील साई टेकडी परिसरात नेऊन लाथाबुक्क्यांनी, कंबरेच्या बेल्टने शरीर सुजेपर्यंत मारहाण करून बारा तासांनंतर त्याला खोलीवर नेऊन सोडले. रुग्णालयात उपचार घेऊन तरुणाने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

मूळ सिल्लोड तालुक्यातील असलेला १७ वर्षीय आशिष (नाव बदलले आहे) नीटची तयारी करतो. उस्मानपुऱ्याच्या उत्सव चौकातील एका क्लासमध्ये त्याने प्रवेश घेतला असून, विकासनगरात किरायाने राहतो. ७ जून रोजी रात्री ८:३० वाजता तो मेसवर जेवण्यासाठी जात होता. यावेळी त्याच्या ओळखीचा अनिकेत त्याला भेटला. त्याच्यासोबत असलेल्या अजयने त्याला बळजबरीने कारमध्ये बसवले. तेव्हा कारमध्ये अनिकेत, अजयसोबत महेश आणि आणखी एक जण होता. कार प्रतापनगरच्या मैदानावर नेऊन सर्वांनी त्याला बेदम मारहाण केली. ‘तू त्या मुलीसोबत का बोलतोस?’ असे म्हणत अनिकेतने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. तेथून साई टेकडी परिसरात नेले.

खासगी रुग्णालयात उपचारसाई टेकडी परिसरात सर्वांनी खाली उतरून पुन्हा आशिषला रस्त्यावर लाथाबुक्क्या, लोखंडी रॉड, कंबरेच्या बेल्टने संपूर्ण शरीर सुजेपर्यंत मारहाण केली. यात आशिष गंभीर जखमी झाला. रात्रभर त्याला त्याच अवस्थेत शहर आणि आसपासच्या परिसरात फिरवत धमक्या देणे सुरूच ठेवले. ८ जून रोजी सकाळी ८ वाजता त्याच्या खोलीजवळ नेऊन सोडून अपहरणकर्ते पसार झाले.

तू माझं वाटोळं केलं...अनिकेत आणि आशिषमध्ये एका मुलीवरून वाद झाला होता. तिच्यासोबत बोलताना अनिकेतने आशिषला पाहिले होते. तेव्हापासून अनिकेतच्या मनात आशिषविषयी राग होता. आशिषला मारताना अनिकेत सतत ‘तू माझं वाटोळं केलं, आता मी तुझं करणार,’ असे म्हणत, जीवे मारण्याची धमकी देत होता. जखमी अवस्थेत आशिषने रुग्णालय गाठले. त्याच्या कुटुंबाने ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर, सायंकाळी त्यांनी निरीक्षक अतुल येरमे यांच्याकडे तक्रार दिली. त्यावरून चार अपहरणकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत पैठणचा रहिवासी असून, त्याचे वय तपासून योग्य कारवाई करू, असे येरमे यांनी सांगितले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरण