छत्रपती संभाजीनगर : स्वत:ची दुचाकी चोरीला गेल्यानंतर त्या चावीने स्विच खराब झालेल्या अन्य दुचाकी सुरू होत असल्याचे लक्षात आले. बांधकामाच्या साईटवर सुपरवायझर म्हणून काम करणारा शेख फारुक शेख ईस्माईल (४८) याने दुचाकी चोरून विक्री करण्यास सुरुवात केली. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्यानंतर एमआयडीसी सिडको पोलिसांनी त्याला १९ जानेवारी रोजी सीपेट महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये चोरी करताना रंगेहाथ पकडून अटक केली.
प्रोझोन मॉलसह एमजीएम कॅम्पसच्या पार्किंगमधून सातत्याने दुचाकी चोरीला जात आहेत. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांच्या सूचनेवरून सहायक निरीक्षक भरत पाचोळे, उपनिरीक्षक संजू काळे यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध सुरू केला होता. १९ जानेवारी रोजी साध्या वेशात गस्त घालत असताना त्यांना एका चोरीच्या फुटेजमधील वेशभूषा, बुटाशी साधर्म्य जुळणारा संशयित सीपेट महाविद्यालयासमोर आढळला. त्याच्याकडील दुचाकीची माहिती काढताच ती चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याला ताब्यात घेत ठाण्यात नेले. अधिक चौकशीत त्याने गेल्या आठ महिन्यांत एमजीएम रुग्णालय, जिल्हा न्यायालय, प्रोझोन मॉल समोरून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. दोन दिवसांत पोलिसांनी त्यातील १५ दुचाकी जप्त केल्या. या सर्व त्याने नारेगाव मध्ये १० ते २० हजारांत विक्री केल्या होत्या. अंमलदार संताेष सोनवणे, संजय नंद, प्रकाश सोनवणे, संतोष गायकवाड, परशुराम सोनुने, अरविंद पुरी, रतन नागलोत यांनी ही कारवाई पार पाडली.
कर्जबाजारी सुपरवायझर ते दुचाकी चोरपूर्वी नारेगावमध्ये राहणारा शेख फारुक याची पत्नी बदनापूरच्या रुग्णालयात नोकरी करते. त्यामुळे नारेगावचे घर विकून तोही तेथेच स्थायिक झाला. २०२२ पर्यंत तो बांधकाम कंत्राटदार असलेल्या काकाकडे सुपरवायझर म्हणून नोकरी करत होता. २०२२ मध्ये काकाचे निधन झाल्यानंतर त्याचे तेही काम सुटले. एका प्लॉटच्या खरेदी-विक्रीत कर्जबाजारी झाला. त्यातच त्याची जालना रोडवरून लाल रंगाची दुचाकी चोरीला गेली. त्या चावीने त्याच्याकडून दुसरी दुचाकी सहज सुरू झाली. त्यानंतर त्याने दुचाकी चोरण्याचा सपाटाच लावला. विशेष म्हणजे, तो केवळ लाल रंगाच्याच दुचाकी चोरत होता. त्याच्याकडून आणखी दुचाकी मिळण्याची शक्यता असल्याचे पोलिस निरीक्षक बागवडे यांनी सांगितले.
Web Summary : After his bike was stolen, a supervisor became a thief, stealing only red bikes. Police arrested him in Chhatrapati Sambhajinagar. He confessed to stealing from various locations. Police recovered fifteen bikes sold cheaply in Naregaon. He was driven by debt after losing his supervisor job.
Web Summary : बाइक चोरी होने के बाद, एक सुपरवाइजर चोर बन गया, सिर्फ लाल बाइकें चुराता था। छत्रपति संभाजीनगर में पुलिस ने उसे गिरफ्तार किया। उसने कई स्थानों से चोरी करना कबूल किया। पुलिस ने नारेगांव में सस्ते में बेची गई पंद्रह बाइकें बरामद कीं। सुपरवाइजर की नौकरी छूटने के बाद वह कर्ज में डूब गया था।