शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेंडवरून दोघे भिडले, त्यांच्या वादात पडल्याने दुसऱ्याच तरुणाच्या पोटात चाकूचा वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 17:03 IST

तीन तासांत दोन मुख्य हल्लेखोर अटकेत, तरुणी पसार

छत्रपती संभाजीनगर : मैत्रिणीसोबत फिरताना पाहिल्याच्या कारणावरून एका तरुणाने अन्य टवाळखोरांच्या मदतीने दोन तरुणांवर हल्ला चढवला. यात ऋत्विक जितेंद्र कुलकर्णी (वय २३, रा. सिल्कमिल कॉलनी) याच्या चेहऱ्यावर दोन, तर पोटात तब्बल १२ इंच खोल वार करून हत्येचा प्रयत्न करण्यात आला.

उस्मानपुरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेय खोत नामक तरुण बुधवारी एका तरुणीसोबत दशमेशनगरमध्ये फिरत होता. मुख्य हल्लेखोर प्रणव हंडोरेला मात्र ही बाब सहन झाली नाही. त्याने गुरुवारी अमेयला भेटण्यासाठी दशमेशनगरमध्ये बोलावले. सायंकाळी ५ वाजता प्रणव हा जवळपास ५ ते ६ टवाळखोरांना सोबत घेऊन गेला होता, तर अमेयचा मित्र ऋतिक त्याच्यासोबत यावेळी उपस्थित होता. वाद असलेली तरुणी देखील या ठिकाणी उपस्थित होती. अमेय व प्रणवमध्ये वाद वाढला व अमेयला सर्वांनी मिळून बेदम मारहाण सुरू केली.

मधे पडला आणि चाकू पोटातमित्राला मारहाणीतून वाचवण्यासाठी ऋतिक भांडणात पडला. मात्र, प्रणवसोबत आलेला मनू काथार याने चाकू काढून थेट ऋतिकचे डोळे, गालावर वार केला. शेवटचा वार ऋतिकच्या पोटात १२ इंच खोलवर झाला. तो क्षणात रक्ताच्या थारोळ्यात पडला. घटनेची माहिती कळताच उस्मानपु्ऱ्याचे निरीक्षक अतुल येरमे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत मनू व प्रणवने धुम ठोकली होती. येरमे यांनी पाठलाग करून दोघांच्या पुंडलिकनगरमध्ये मुसक्या आवळल्या. रात्री उशिरापर्यंत त्या दोघांसह तरुणी व अन्य मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती, अशी माहिती येरमे यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर