‘त्या’ अंगणवाडीची तात्काळ दुरुस्ती होणार

By Admin | Updated: July 16, 2014 01:25 IST2014-07-16T00:15:22+5:302014-07-16T01:25:14+5:30

लामजना : येथील अंगणवाडी क्र. ७ ला जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.आर. कागणे यांनी भेट देऊन अंगणवाडीची दुरुस्ती करण्यात येईल, असे सोमवारी सांगितले.

The 'anganwadi' will be repaired immediately | ‘त्या’ अंगणवाडीची तात्काळ दुरुस्ती होणार

‘त्या’ अंगणवाडीची तात्काळ दुरुस्ती होणार

लामजना : येथील अंगणवाडी क्र. ७ ला जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.आर. कागणे यांनी भेट देऊन अंगणवाडीची दुरुस्ती करण्यात येईल, असे सोमवारी सांगितले.
लामजना येथील अंगणवाडीच्या दुरवस्थेसंदर्भात ‘दुरवस्थेमुळे अंगणवाडी उघड्यावर’ या मथळ्याखाली सोमवारी वृत्त प्रकाशित झाले होते. त्याची दखल घेऊन पाहणी करण्यात आली. यावेळी बालविकास प्रकल्पाधिकारी व्ही.एम. मोरे, सरपंच मंगल कांबळे, जिल्हा परिषद सदस्या सुलोचना बिदादा, तंटामुक्तीचे अध्यक्ष सिद्राम कांबळे, अंगणवाडी पर्यवेक्षिका एस.एम. गुरव उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी कागणे म्हणाले, जिल्ह्यातील नवीन अंगणवाड्यांसाठी साडेपाच कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. गेल्यावर्षीचे ३ कोटी रुपये आहेत. एकूण साडेआठ कोटी रुपयांतून नवीन अंगणवाड्या बांधण्यात येणार आहेत.
चालू वर्षात १११ आणि गेल्यावर्षीच्या ७० अशा एकूण १८१ अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे बालकांची गैरसोय दूर होणार आहे. (वार्ताहर)

Web Title: The 'anganwadi' will be repaired immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.