अंगारकीनिमित्त तयारी

By Admin | Updated: July 14, 2014 01:01 IST2014-07-13T23:25:58+5:302014-07-14T01:01:54+5:30

राजूर : १५ जुलै रोजी मंंंगळवारीय अंगारिका चतुर्थी असल्याने राजुरेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन गणपती संस्थानने भाविकांच्या सुरळीत दर्शनासाठी पूर्वतयारी सुरू केली आहे.

Anganwadi preparation | अंगारकीनिमित्त तयारी

अंगारकीनिमित्त तयारी

राजूर : १५ जुलै रोजी मंंंगळवारीय अंगारिका चतुर्थी असल्याने राजुरेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन गणपती संस्थानने भाविकांच्या सुरळीत दर्शनासाठी पूर्वतयारी सुरू केली आहे. तसेच व्यापारी सुद्धा तयारीला लागल्याचे चित्र राजुरात दिसून येत आहे.
राजुरचा महागणपती साडेतीन पिठांपैकी एक पूर्ण पीठ आहे. नवसाला पावणारा गणराया म्हणून राजूरेश्वराची महती दिवसेंदिवस वाढत असल्याने दरमहा येणाऱ्या संकष्टी चतुर्थीसह दररोज भाविकांच्या संख्येत दर्शनासाठी वाढ होत आहे. त्यातच मंंगळवारीय येणाऱ्या अंगारिका चतुर्थीचे गणेश भक्तांत विशेष महत्वाचे मानले जाते. त्यामुळे लाखो भाविकांची अंगारिका चतुर्थीला दर्शनासाठी गर्दी उसळते. संभाव्य भाविकांची गर्दी लक्षात घेऊन त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची दक्षता गणपती संस्थान कडून घेतली जात आहे. अंगारिकेला राजूरेश्वराच्या दर्शनासाठी मराठवाडा, विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून भाविक अनवाणी पायी येतात. भाविकांच्या सोयीसाठी दर्शनरांगेत कठडे उभारण्याचे काम युध्दपातळीवर काम सुरू असून अन्य बाबीकडे संस्थान लक्ष देत आहे. भाविकांसाठी दिवसरात्र वीजपुरवठा, जादा बसेस, आरोग्य सुविधा, पोलिस बंदोबस्त, पाणीपुरवठा, संभाव्य पावसा पासून बचावासाठी शामीयाना आदी कामांची जय्यत तयारी सुरू असल्याचे गणपती संस्थानचे व्यवस्थापक गणेशराव साबळे यांनी सांगितले.
भाविकांनी गर्दीच्या ठिकाणी कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता दक्ष राहावे.अन्यथा चेंगराचेंगरी होऊन हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे पोलीस निरीक्षक बल्लाळ म्हणाले. तसेच पोलिस व स्वयंसेवकांच्या मार्गदर्शनानुसार मंदिर परिसरात भाविकांनी वाटचाल करावी.
महिलांनी आपल्या अंगावर मोल्यवान दागिने व किंमती वस्तू आणणे टाळावे. संशयित व्यक्ती अथवा वस्तू आढळून आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. आदल्या दिवशी पायी येणाऱ्या भाविकांनी शिस्तीत व गटागटाने शांततेत मार्गक्रमण करावे. तसेच महिला व युवतींनी एकटे येणे टाळावे. असे आवाहन बल्लाळ यांनी केले आहे.
संस्थानने घेतला आढावा
लाखो भाविकांची संभाव्य उसळणारी गर्दी लक्षात घेऊन संस्थानने येथील विविध खाते प्रमुखांची बैठक घेतली. यामध्ये कठडे, भाविकांना पिण्याचे पाणी, अखंडीत वीजपुरवठा, आरोग्य सेवा, वाहतूक व्यवस्था, संभाव्य पावसापासून बचाव, आदी सुविधा मुद्यावर चर्चा करण्यात आली. तसेच तहसीलदार रूपा चित्रक व विश्वस्तांनी पाहणी करून संबधितांना सूचना दिल्या. यावेळी सरपंच शिवाजीराव पुंगळे, विश्वस्त साहेबराव भालेराव, व्यवस्थापक गणेशराव साबळे, प्रशांत दानवे, भगवान टेपले, डॉ.चव्हाण, गजानन गावंडे, वाहतूक नियंत्रक पवार, तलाठी डी.एस.खरात, ताठे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
अंगारिका चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पुरेशा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असला तरी, भाविक व जनतेने संयमाने दर्शन घेऊन पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन हसनाबाद ठाण्याचे स.पो.नि. शीतलकुमार बल्लाळ यांनी केले आहे.

Web Title: Anganwadi preparation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.