अंगणवाडी मदतनीस, सेविकांचा बीडमध्ये मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:35 IST2017-09-12T00:35:07+5:302017-09-12T00:35:07+5:30
सोमवारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघ यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

अंगणवाडी मदतनीस, सेविकांचा बीडमध्ये मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : अंगणवाडी सेविका, मदतनिसांच्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी सोमवारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघ यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यामध्ये मदतनीस, सेविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
अंगणवाडी सेविका व मदतनिसांना उन्हाळी सुट्या देण्यात याव्यात, कमीत कमी एक महिना आजारी रजा द्यावी, ३० एप्रिल २०१४ च्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील सेवानिवृत्त झालेल्यांना तात्काळ पेन्शन द्यावे, मयत कर्मचाºयांच्या वारसांना विमा द्यावा, प्रवासभत्ता व इंधन बिल तात्काळ देण्यात यावे, ५००० रुपये दिवाळी भेट देण्यात यावी, ज्या अंगणवाडी कार्यकर्तींना ५ व १० वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांच्या मानधनात वाढ करावी, सेवासमाप्तीनंतर मिळणाºया एकरकमी लाभात वाढ करून कायकर्तीस १ लाखावरून २ लाख, तर मदतनिसास ७५ हजारावरून दीड लाख रुपये लाभ देण्यात यावा, जुलै २०१३ पासून केंद्र शासनाने मिनी अंगणवाडी कार्यकर्तीच्या मानधनात दरमहा ७५० रुपयांची वाढ केलेली आहे. त्याचा फरक तात्काळ अदा करण्यात यावा, माजलगाव तालुक्यातील लवूळ येथील अंगणवाडी मदतनीस, कार्यकर्ती पदासाठी पात्र असून, तिला प्रमोशन द्यावे या मागण्यांसाठी मोर्चा निघाला.