अन् वाळूचा ट्रक थेट घरातच घुसला...
By Admin | Updated: May 25, 2016 00:28 IST2016-05-25T00:24:22+5:302016-05-25T00:28:32+5:30
औरंगाबाद : भरधाव वाळूच्या ट्रकचे (हायवा) ब्रेक निकामी झाल्याने रस्त्यावरील रिक्षांना धडक देत हा ट्रक थेट एका घरात घुसल्याची घटना मंगळवारी सकाळी १०.३० वाजता शहरातील रवींद्रनगर येथे घडली.

अन् वाळूचा ट्रक थेट घरातच घुसला...
औरंगाबाद : भरधाव वाळूच्या ट्रकचे (हायवा) ब्रेक निकामी झाल्याने रस्त्यावरील रिक्षांना धडक देत हा ट्रक थेट एका घरात घुसल्याची घटना मंगळवारी सकाळी १०.३० वाजता शहरातील रवींद्रनगर येथे घडली. यावेळी पाठीमागील चाक नाल्याच्या ढाप्यात अडकल्याने ट्रक आणखी पुढे जाण्यापासून रोखला गेला. त्यामुळे सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नाही.
रमेश अरगडे यांच्या मालकीच्या या ट्रक (क्र.एमएच-२०, एटी३२००) चे ब्रेक नादुरुस्त झाल्यामुळे तो दुरुस्तीसाठी सिंधी कॉलनीतील गॅरेजमध्ये नेण्यात आला होता. दुरुस्ती झाल्यानंतर चालक बाबासाहेब बनसोडे हे ट्रक बालाजीनगरमार्गे वाळूजकडे बुधवारी (पान २ वर)