शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

... आणि घडला लडाखी व मराठीचा स्नेहमेळ!

By admin | Updated: December 28, 2014 01:24 IST

औरंगाबाद : लेह ते औरंगाबाद असा हजारो मैलांचा प्रवास करून पर्यटनासाठी आलेल्या लडाखी मुला-मुलींच्या असंख्य प्रश्नांना शनिवारी उत्तरे मिळाली.

औरंगाबाद : वृत्तपत्र कसे निघते? ते कुठे छापले जाते? पत्रकार बातम्या कशा मिळवतात? लेह ते औरंगाबाद असा हजारो मैलांचा प्रवास करून पर्यटनासाठी आलेल्या लडाखी मुला-मुलींच्या असंख्य प्रश्नांना शनिवारी उत्तरे मिळाली. गोऱ्या-गुलाबी चेहऱ्यावरचे अपार कुतूहल, निरागस बोलके डोळे आणि जग समजावून घेण्याची उमेद हाताशी घेऊन आलेल्या या भारतीय जवानांच्या पाल्यांनी शनिवारी ‘लोकमत’ ला सदिच्छा भेट दिली. औरंगाबादच्या कॅन्टोनमेंटतर्फे ही स्नेहभेट घडवण्यात आली. लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, प्रख्यात हॉकीपटू धनराज पिल्ले, मेजर अजितकुमार, लेफ्टनंट कर्नल अमन गिल व त्यांचे कुटुंबिय, प्रोझोन मॉलचे संचालक अनिल इरावणे उपस्थित होते. दर्डा यांनी मुलांना कार्यालयातील विविध विभागांची कार्यपद्धती समजावून दिली. वृत्तपत्र प्रकाशित होण्याआधी ते कोणत्या टप्प्यामधून जाते याची सविस्तर माहिती देत त्यांच्याशी मुक्तसंवाद केला. लेह येथील आर्मी पब्लिक स्कूलमधील ३० मुले देशभरातील ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जाणून घेण्यासाठी आली आहेत. भारतीय लष्कराने ‘मिशन सद्भावना’ अंतर्गत हा उपक्रम हाती घेतलाआहे. आज या मुलांच्या भेटीत ब्रिगेडिअर मनोजकुमार यांनी पुढाकार घेतला. यात महाराष्ट्रातील मोठ्या शहरांना भेटी दिल्यानंतर या मुलांनी मॉलमधला झगमगाट, वाहनांची वर्दळ आणि उंचच उंच इमारती पहिल्यांदाच पाहिल्या. हा अनुभव कसा होता या प्रश्नावर नवव्या इयत्तेमध्ये शिकणारी जिग्नेट नॉरझिन म्हणाली, ‘इतक्या मोठ्या, दिव्यांनी चमचमणारे शहर पाहून मी हरवून गेले. मात्र, इथल्या घाईगर्दीपेक्षा मला आमचा निसर्गरम्य शांत, सौम्य लेह जास्त आवडतो.’ स्टॅन्झिनला खूप शिकून डॉक्टर व्हायचे आहे. ती म्हणते,‘मला माझे गाव खूप आवडते; पण इकडल्यासारखे उच्चशिक्षण घेण्याच्या सुविधा आमच्याकडे नाहीत. इकडे येऊन मी शिकेन.’ पण डॉक्टर झाल्यावर परत लेहला जाऊन तेथील लोकांची सेवा करणार हे सांगायला ती विसरत नाही! या मुलांचे शिक्षक कॅप्टन जिग्मेट सिनगे व तेत्सान अँगमो यांनी लेहमधली जीवनशैली, जनजीवन याबाबत संवाद साधला. ते म्हणाले, ‘आम्ही सगळे राहतो त्या भागाची उंची आहे किमान अकरा हजार फूट! वर्षातील सहा महिने उणे तीस अंशांपर्यंत जाणारी भयानक थंडी आणि बर्फवृष्टी, उरलेले सहा महिने सूर्यप्रकाश अशा वातावरणात आम्ही राहतो. तुमच्याकडचे हे हिवाळ्याचे तापमान आमच्याकडे अगदीच सामान्य समजले जाते.