अन् डेपो मॅनेजर बचावले...!
By Admin | Updated: November 9, 2016 01:38 IST2016-11-09T01:30:40+5:302016-11-09T01:38:53+5:30
औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकात आगार व्यवस्थापकांच्या कक्षाला एसटीने धडक दिल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. यावेळी कक्षात विभाग नियंत्रक आर. एन. पाटील होते;

अन् डेपो मॅनेजर बचावले...!
औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकात आगार व्यवस्थापकांच्या कक्षाला एसटीने धडक दिल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. यावेळी कक्षात विभाग नियंत्रक आर. एन. पाटील होते; परंतु सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. या धडकेत तडे गेल्याने भिंत पूर्णपणे खिळखिळी झाली. कोणत्याही क्षणी ही भिंत कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
मध्यवर्ती बसस्थानकात सकाळी पाहणी करण्यासाठी आर. एन. पाटील आले होते. यावेळी ते आगार व्यवस्थापकांच्या कक्षात थांबले होते. दरम्यान, दुरु स्तीसाठी आलेली एसटी बस चालक आगार व्यवस्थापकांच्या कक्षासमोरील जागेत आणत होता. अचानक एसटीचा वेग वाढला आणि ती सरळ आगार व्यवस्थापकांच्या कक्षाला जाऊन धडकली.
यावेळी या ठिकाणी कामगारांसाठी असलेल्या पाण्याच्या फ्रीजला धडक देत ही बस भिंतीवर आदळली. यामध्ये फ्रीज पूर्णपणे खराब झाला. धडक एवढी जबरदस्त होती की, पूर्ण भिंतीला तडे गेले. त्यामुळे भिंत कमकुवत झाली असून एका बाजूला कलली आहे. त्यामुळे ती कधीही कोसळण्याची शक्यता आहे. या कक्षात आर. एन. पाटील होते. ते बालंबाल बचावल्याची चर्चा अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये सुरू होती. क्लचमधील दोषामुळे ही घटना झाल्याचे आर. एन. पाटील यांनी सांगितले.