...आणि ४२ पर्यटक बालंबाल बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:58 IST2017-08-22T00:58:37+5:302017-08-22T00:58:37+5:30
अजिंठा लेणीतून पर्यटकांना घेऊन येणाºया धावत्या एस.टी. बसचा टायर स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस अनियंत्रित झाली, पण चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अपघात टळला.

...आणि ४२ पर्यटक बालंबाल बचावले
लोकमत न्यूज नेटवर्क
फर्दापूर : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतून पर्यटकांना घेऊन येणाºया धावत्या एस.टी. बसचा टायर स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस अनियंत्रित झाली, पण चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अपघात टळला. यामुळे
बसमधील ४२ पर्यटक बालंबाल बचावल्याची घटना लेणी मार्गावरील कालिंका माता मंदिर परिसरात रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर सोयगाव बस आगाराच्या ढिसाळ कारभाराचा नमुना समोर आला आहे.
सोयगाव आगाराचे चालक सुरवाडे हे प्रदूषणमुक्त समजल्या जाणाºया बसमधून (क्र. एमएच २० बीएल ३२८०) मधून ४२ पर्यटकांना घेऊन अजिंठा लेणीतून फर्दापूर टी पॉइंटच्या दिशेने निघाले असता उतार उतरत असताना या धावत्या बसचा टायर स्टेअरिंग रॉड अचानक तुटला.
रॉड तुटताच ही बस अनियंत्रीत होऊन उतारावरील झाडावर आदळण्याच्या दिशेने झेपावली, मात्र ऐनवेळी चालक सुरवाडे यांनी प्रसंगावधान दाखवून मोठ्या कसोशीने बसवर नियंत्रण मिळवून बस रस्त्याच्या कडेवर थांबवली व बसमधील ४२ पर्यटकांना सुरक्षित खाली उतरवले. यानंतर पर्यटकांनी एस.टी. महामंडळाच्या भोंगय कारभाराविरुद्ध नाराजी व्यक्त करुन कारवाई करण्याची मागणी केली.
देश-विदेशातून येणारे पर्यटक अशी गैरसोय पाहून काय प्रतिक्रिया देत असतील, याचा विचार एस.टी. महामंडळाने आता करायला हवा.